शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षगणनेचा ‘पत्ताच’ नाही

By admin | Updated: July 8, 2016 00:59 IST

उद्यान विभाग : बिल अदा करूनही माहिती देण्यास असमर्थता; ढपल्याची शक्यता

कोल्हापूर : प्रत्येक पाच वर्षांनी शहरातील वृक्षांची गणना करणे कायद्याने बंधनकारक असताना महानगरपालिकेने गेल्या सहा वर्षांत वृक्षगणना केली किंवा नाही याची माहिती उघड करण्यात उद्यान विभागाने असमर्थता दाखविली आहे. एका ठेकेदाराने अर्धवट काम केल्यामुळे दुसऱ्या ठेकेदाराकडून वृक्षांची गणना करून घेण्यात आली; परंतु माहिती उघड न केल्यामुळे काम चोखपणे झाले की नाही, याची शंका येऊ लागली आहे. उद्यान विभागासह अन्य अधिकाऱ्यांनीही वृक्षगणनेबाबत तोंडावर बोट ठेवल्यामुळे या कामातही ढपला पाडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या कामात केवळ अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याने त्याबाबत पर्यावरण कार्यकर्त्यांनाच नाही, तर खुद्द महानगरपालिकेने स्थापन केलेल्या वृक्ष प्राधिकरणाच्या सभेतही ही माहिती मागूनसुद्धा सादर केलेली नाही. उच्च न्यायालयाचे निर्देश तसेच कायद्याने प्रत्येक पाच वर्षांनी शहरातील वृक्षगणना करणे आवश्यक आहे. कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे ही गणना केली असे दाखविले जाते; परंतु प्रत्यक्षात त्याचा तपशील कधीही बाहेर येत नाही. सहा वर्षांपूर्वी वृक्षगणनेचे सुर्वे कन्सल्टंटना काम देण्यात आले. त्यांनी ४० प्रभागांचे काम पूर्ण केल्यानंतर अहवालात अनेक प्रकारच्या त्रुटी आढळून आल्या. झुडपांनाही त्यांनी वृक्ष म्हणून गणले गेल्याची बाब पुढे आली. त्यांना अहवाल दुरुस्त करून द्या, असे प्रशासनाने सांगितले. त्यावेळी त्यांनी काम अर्धवट सोडले. एका ठेकेदाराने काम सोडल्यानंतर मुंबईतील दुसऱ्या ठेकेदाराकरवी हे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांना ३२ प्रभागांतील काम देण्यात आले. त्यांनी काम पूर्ण केले की नाही, अहवाल दिला की नाही, याचा कोणताही तपशील अद्याप दिलेला नाही.शहरात कोणत्या ठिकाणी किती वृक्ष आहेत, त्यांची जात कोणती आहे, उंची किती आहे, घेर किती आहे, धोकादायक वृक्ष कोठे आहेत याचे सर्वेक्षण करण्यात येते. त्याचा अहवाल तयार झाला की त्या आधारावर वृक्षलागवडीचे धोरण निश्चित करण्यात येते; पण असा अहवालच प्रसिद्ध झाला नसल्याने धोरण ठरलेले नाही. ७० ते ८० लाख खर्च शहरात अंदाजे सात लाख वृक्ष असल्याची माहिती सांगण्यात येते. प्रत्येक वृक्षाची गणना करून माहिती संकलित करण्यासाठी पहिल्या ठेकेदारास आठ रुपये ५० पैसे, तर दुसऱ्या ठेकेदारास १० रुपये ४० पैसे दिले असल्याची माहिती पुढे आली आहे. या हिशेबाने या वृक्षगणनेवर ७० ते ८० लाख रुपये खर्च झाले असण्याची शक्यता आहे; पण त्याकडे कोणीच लक्ष दिलेले नाही.