शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

आहारमूल्यांचा खजिना

By admin | Updated: August 3, 2014 23:34 IST

रोज १०० ते १२५ टनाची विक्री : केळ हे आरोग्यदायी, बहूपयोगी फळ

सचिन भोसले - कोल्हापूरकेळ हे सर्वांच्या परिचयाचे फळ आहे. आहारमूल्यांचे उच्च प्रमाण असूनही स्वस्त दरात उपलब्ध होणारी केळी ‘सर्वसामान्यांचे फळ’ म्हणून प्रसिद्ध आहेत. घराघरांत आवडीने खाल्ले जाणारे हे फळ आहे. अशा या केळामध्ये विविध औषधी गुणांचा खजिना आहे. तसेच उपवास म्हटले की, फराळासाठी हमखास पुढे केले जाणारे बारमाही फळ म्हणजे केळी होय. अशा या केळीचा गोडवा काय वर्णावा! त्याचे महत्त्व ‘लोकमत’संगे जाणून घेऊ. कोल्हापूरकरांना अशीही केळी रोज १०० ते १२५ टन लागतात. तर गणेशोत्सव, दसरा, दिवाळी, ईद या सणांत दीडशे टनांपर्यंत विक्रीही होते. मुसा जातीच्या झाडांना आणि त्यांच्या फळाला ‘केळी’ असे म्हणतात. केळीचे मूळ स्थान दक्षिणपूर्व आशियातील मानले जाते. सध्या संपूर्ण उष्णकटिबंधीय प्रदेशात केळीची लागवड केली जाते. प्रामुख्याने फळांच्या उत्पादनासाठी याची लागवड करण्यात येते. --जेवणानंतर फळे खाणे आरोग्यास अधिक फायदेशीर असते. आपल्या तब्येतीनुसार जेवणानंतर सगळ्यांनी मोसमी फळे खाल्ली पाहिजेत. फळांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्याद्वारे आपल्या शरीराला आवश्यक ते प्रोटीन तसेच व्हिटॅमिन मिळत असतात. ---शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढीस लागते. फळांमध्ये केळी हे फळ तर आहेच; परंतु ते एक उत्तम आहे. केळी खाल्याने भूक शमते व आरोग्याला लाभदायी असते. पिकलेल्या केळीत आयोडीन, साखर व प्रोटीन आढळतात, तर कच्च्या केळीत कॅल्शियम अधिक मिळते. कच्च्या केळीची भाजीही केली जाते. --दररोज दोन केळी खाल्ल्याने शरीराला आवश्यक अशा सर्व प्रकारच्या जीवनसत्त्वांची पूर्तता होते. सकाळी उठल्यानंतर दोन केळी खाल्ल्यानंतर कोमट दूध पिले पाहिजे. नैसर्गिकदृष्ट्या पिकलेले केळ आरोग्यास उत्तम असते. --एक ग्लास दुधात एक चमचा शुद्ध तूप, चिमूटभर इलायची पूड मिसळून एक केळी खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते. तसेच दररोज दोन केळी खाल्ल्यानंतर हृदयरोग व रक्तदाबही प्रमाणात येण्यास मदत होते. --विविध रासायनिक आणि कृत्रिम औषधे, ज्यांमध्ये एस्परिन, इंडोमेथासिन, सिस्टयामाईन, हिस्टामाईन यांचे सेवन केल्यानंतर अनेक लोकांचे तोंड येते. तोंडात व्रण पडतात. आधुनिक संशोधनानुसार कच्चे केळ वाळवून त्याचे चूर्ण तयार करून सेवन केल्यास तोंड येत नाही. पिकविण्याची पद्धत--साधारणत: केळी बंद खोलीत पिकविली जातात; तर मुंबई व चेन्नई या ठिकाणी शेणींचा धूर करून बंदिस्त खोलीत केळींना पिकविले जाते. याचबरोबर सर्वसामान्य तापमानाला केळी पिकविली जाते. उन्हाळ्यात १८ ते २४ तास धुरी दिली जाते; तर हिवाळ्यात ४८ तास धुरी दिली जाते. --केळी काढल्यानंतर पिवळा रंग येण्यासाठी ८ ते १५ दिवसांचा कालावधी लागतो. कार्बाईड घालून केळी पिकविण्याच्या पद्धतीवर बंदी घालण्यात आली आहे. अशी केळी खाल्ल्यास आरोग्य बिघडण्याची शक्यता असल्याने या पद्धतीवर बंदी आहे. असा होता उपयोग--पूर्वीपासून केळी फळाचा मुख्य उपयोग खाण्यासाठी केला जातो. सध्या केळीपासून वेफर्स, जाम, भुकटी, पीठ, प्युरी, सुकेळी, पेठे, शिरका, बिस्कीट असे अनेक पदार्थ तयार केले जातात. कच्च्या केळीची भाजी पूर्वीपासून बनवितात. केळीच्या पानांचा उपयोग दक्षिण भारतात जेवण वाढण्यासाठी केला जातो. तसेच जनावरांना चारा म्हणूनही केला जातो; तर वाळलेली पाने इंधन म्हणूनही वापरता येतात.सांस्कृतिक महत्त्व--केळीच्या खांबांना म्हणजे झाडाच्या खोडाला आंब्याच्या पानांच्या तोरणाप्रमाणेच शुभसूचक, मांगल्याचे प्रतीक मानले जाते. लग्न, मुंज, अशा शुभकार्याप्रसंगी प्रवेशद्वारावर केळीचे दोन उंच व पाने असलेले खांब रोवून त्यांचे तोरण केले जाते. केळी उत्पादनात भारत अग्रेसर --केळीच्या उत्पादनात जागतिक पातळीवर भारत प्रथम, तर देशात महाराष्ट्र राज्य प्रथम आहे. केळीच्या जागतिक उत्पादनापैकी भारतात २० टक्के उत्पादन होते. भारतातील एकूण उत्पादनापैकी महाराष्ट्रात २५ टक्के उत्पादन होते. महाराष्ट्रात जळगाव जिल्हा अग्रेसर आहे. रावेर आणि यावलमध्ये केळी उत्पादन अधिक आहे. केळीच्या जाती ---बसराई, श्रीमंती, वेलची, सोनकेळी, वसई, जवारी, हेब्बाळी, लालकेळी, चक्रकेळी, कुन्नन, अमृतसागर, बोंथा, विरूपाक्षी, हरिसाल, सफेद वेलची, लाल वेलची, वामन केळी, ग्रोमोशेल, पिसांग, लिलिन, जायंट गर्व्हनर, कॅव्हेंडिशी, ग्रॅडनैन, राजापुरी, बनकेळ, भरकेल, मुधेली, राजेळी, या जातींची केळी बाजारात येतात. मात्र, कोल्हापूरच्या बाजारात वेलची, हरिसाल, बसराई, सोनकेळी, वसई, जवारी, हेब्बाळी या जातींचीच केळी मोठी मागणी असल्याने येतात.