शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जीवदानासाठीची ‘श्रीकृष्ण’ची धडपड व्यर्थच

By admin | Updated: September 30, 2015 00:34 IST

विद्युत तारांवर दुपारी दोऱ्यात अडकून एक कबूतर लोंबकळत होते. त्यातून सुटका करण्यासाठी ते जिवाचा आकांत करून ओरडत होते. मात्र, त्याचा आवाज डॉल्बीच्या आवाजात विरून जात होता

विजय दळवी -कोल्हापूर --अखंडपणे डॉल्बीच्या ठेक्यावर जल्लोषाने थिरकणाऱ्या तरुणाईला ‘त्याच्या’कडे लक्ष द्यायला वेळच नव्हता. कारण तो असाहाय्य पक्षी होता. पतंगाच्या मांजाच्या दोऱ्यात पंख अडकून जखमी झाल्याने खाली पडतानाच विजेच्या तारांमध्ये दोरा अडकल्याने तो खाली लोंबकळत होता. त्याच्या मदतीला ‘श्रीकृष्ण’ धावून आले; मात्र उपचार करून तो काही हाती लागला नाही.रविवारी सर्वत्र अनंत चतुर्दशीची धामधूम सुरू होती. शहरातील विसर्जनाच्या मुख्य मार्गावरील शुक्रवार पेठेतील जनवाडकर कॉम्प्लेक्सजवळ विद्युत तारांवर दुपारी दोऱ्यात अडकून एक कबूतर लोंबकळत होते. त्यातून सुटका करण्यासाठी ते जिवाचा आकांत करून ओरडत होते. मात्र, त्याचा आवाज डॉल्बीच्या आवाजात विरून जात होता. अनेक मंडळांचे कार्यकर्ते तर त्या कबुतराकडे पाहत माणुसकी विसरून हिडीस नृत्य करण्यात दंग होते. मात्र, त्याला अपवाद ठरले ते रेगे तिकटीवरील श्रीकृष्ण तरुण मंडळ. या मंडळाची मिरवणूक येथून जात असताना मंडळाच्या कार्यकर्त्यांना ते लोंबकळणारे ‘ते’ असाहाय्य कबूतर दिसले. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्याला वाचविण्याची धडपड सुरू केली. यावेळी काठीच्या साहाय्याने त्या कबुतराला खाली उतरविले. त्यावर उपचार करण्यासाठी प्रयत्न केला; मात्र उशीर झाल्याने त्यांचे प्रयत्न व्यर्थ ठरले. हीच माणुसकी यापूर्वी या मार्गावरून जाणाऱ्या इतर मंडळांनी दाखविली असती तर ‘त्या’ निष्पाप जिवाचे प्राण नक्कीच वाचले असते. पतंग उडविताना पतंगाचा मांजा दोरा आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांच्या जिवावर बेतू लागला आहे. नायलॉनच्या दोऱ्याने पर्यावरणास होणाऱ्या हानीमुळे मांजा दोऱ्याच्या वापरावर नागपूर पोलिसांनी घातलेली बंदी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे; मात्र तरीही त्याची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर होताना दिसत नाही. त्यामुळेच आजही हजारो पक्षी जखमी व गतप्राण होत आहेत.आमच्या मंडळाची मूर्ती घेऊन जाताना आम्हाला विजेच्या तारांमधून दोऱ्यात अडकलेले कबूतर दिसले. त्याला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी काठीच्या साहाय्याने खाली काढले. मात्र, दुर्दैवाने उपचार सुरू असतानाच ते गतप्राण झाले. - दीपक निगवेकर,अध्यक्ष श्रीकृष्ण तरुण मंडळ