शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षा, मुख्याधिकाऱ्यांना घेराव

By admin | Updated: September 24, 2016 00:54 IST

इचलकरंजी पालिकेत तणाव : घरकुलाची मागणी, मुख्याधिकाऱ्यांच्या निषेधाच्या घोषणा; आश्वासनानंतर उपोषण मागे

इचलकरंजी : जयभीम झोपडपट्टीवासीयांसाठी बांधण्यात आलेल्या इमारतीमधील घरकुलांचा ताबा मिळावा, या मागणीसाठी शुक्रवारी लाभार्थी आंदोलनकर्ते नगरपालिकेत घुसले. त्यांनी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे व मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांना घेराव घातला. मुख्याधिकाऱ्यांच्या निषेधाच्या घोषणाबाजीमुळे वातावरण दणाणून सोडल्याने पालिकेत तणाव निर्माण झाला. दोन तासांच्या आंदोलनानंतर सर्व झोपडपट्टीवासीयांना घरकुले देण्यासाठी गुरुवारी (दि. २८) विशेष सभा घेण्यात येईल, अशी ग्वाही मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांनी दिल्यानंतर आंदोलन संपुष्टात आले. जयभीम झोपडपट्टीवासीयांना केंद्र सरकारच्या योजनेतून घरकुले बांधून देण्यासाठी अपार्टमेंट पद्धतीच्या इमारती बांधण्याचे काम सुरू आहे. सध्या ६१२ घरकुलांच्या इमारती बांधून त्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत, तर १०८ घरकुलांसाठी इमारतीचे बांधकाम अद्याप सुरू केलेले नाही. आता अंतिम टप्प्यात आलेल्या इमारती पूर्ण करून त्याचा ताबा लाभार्थ्यांना द्यावा आणि उर्वरित १०८ घरकुलांच्या इमारतींचे बांधकाम सुरू करावे, या मागणीसाठी गेले चार दिवस नगरपालिकेसमोर लाभार्थ्यांच्यावतीने उपोषण सुरू आहे. गुरुवारी झोपडपट्टीवासीयांबरोबर झालेल्या बैठकीत मक्तेदाराबरोबर शुक्रवारी बैठक घेऊन घरकुलांचा विषय निर्गत करण्यात येईल, असे मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांनी सांगितले होते. शुक्रवारी दुपारी साडेचार वाजेपर्यंत झोपडपट्टीवासीयांनी बैठकीची वाट पाहिली. मात्र, मुख्याधिकारी व मक्तेदार हे दोघेही नगरपालिकेकडे फिरकले नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या सुमारे शंभरभर महिला-पुरुष लाभार्थी नगरपालिकेत शिरले. मुख्याधिकाऱ्यांच्या घोषणा देत त्यांनी नगराध्यक्षांचे दालन गाठले आणि नगराध्यक्षा बिरंजे यांना घेराव घातला. लाभार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी उपमुख्याधिकारी डॉ. पवन म्हेत्रे आले; पण आंदोलनकर्त्यांनी मुख्याधिकारीच आले पाहिजेत, असा आग्रह धरला. संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांचा पवित्रा पाहता नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्षा व उपमुख्याधिकारी यांच्याभोवती संरक्षक कडे केले. मात्र, महिला-पुरुषआंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करून पालिकेतील वातावरण दणाणून सोडले. तासाभराने मुख्याधिकारी डॉ. रसाळ पोलिस बंदोबस्तात दालनात आले. त्यावेळी सुद्धा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी दालनात पोलिस निरीक्षक सतीश पवार, सहायक पोलिस निरीक्षक युवराज खाडे हे पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी आले. तेथे आलेल्या नगरसेवक विठ्ठल चोपडे यांनी मध्यस्थी केली. दोन्ही बाजूंशी चर्चा करून तोडगा काढला. आंदोलकांच्या म्हणण्याप्रमाणे सर्वच लाभार्थ्यांना घरकुले देण्यासाठी गुरुवारी विशेष सभेचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. २.३७ कोटी वर्गसाठी गुरुवारी सभा सध्या अंतिम अवस्थेत असलेली ६१२ घरकुले आणि नव्याने बांधण्यात येणाऱ्या १०८ घरकुलांच्या इमारती बांधण्यासाठी ३.७७ कोटी रुपये लागणार आहेत. त्यापैकी १ कोटी ४० लाख रुपये नगरपालिकेला शासनाकडून प्राप्त झाले आहेत. त्यामधील १ कोटी ४ लाखांचा धनादेश मक्तेदाराला देऊन ६१२ घरकुलांचे अंतिम टप्प्यातील काम केले जाईल. तसेच उर्वरित २.३७ कोटी रुपये १४ व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून वर्ग करण्यासाठी गुरुवारी विशेष सभा बोलावली जाईल. त्यामुळे जयभीम झोपडपट्टीवासीयांचा प्रश्न निर्गत होईल, अशी माहिती शुक्रवारच्या बैठकीच्या शेवटी नगरसेवक चोपडे यांनी सांगितली.