शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या पर्यटकांची आंबोलीत हुल्लडबाजी; अकराजण ताब्यात

By admin | Updated: August 3, 2015 00:48 IST

आंबोली येथे आज वर्षा पर्यटनाच्या निमित्ताने हजारो पर्यटक आले होते. या पर्यटकांमध्ये गोवा, कर्नाटक तसेच कोल्हापूर, सिंधुदुर्ग येथील पर्यटकांचा भरणा जास्त होता.

सावंतवाडी : आंबोलीत पर्यटनाच्या नावाखाली हुल्लडबाजी करणाऱ्या अकरा पर्यटकांना पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले. हे सर्व पर्यटक कोल्हापूर जिल्ह्यातील असून, उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. मात्र, कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे पोलीस निरीक्षक रणजित देसाई यांनी सांगितले. हा प्रकार रविवारी सायंकाळी घडला.आंबोली येथे आज वर्षा पर्यटनाच्या निमित्ताने हजारो पर्यटक आले होते. या पर्यटकांमध्ये गोवा, कर्नाटक तसेच कोल्हापूर, सिंधुदुर्ग येथील पर्यटकांचा भरणा जास्त होता. पोलिसांनीही कडक बंदोबस्त ठेवला होता. सायंकाळी पोलिसांनी मुख्य धबधब्यावरून पर्यटकांना खाली येण्यास सांगितले. त्यावेळी काही पर्यटक मद्यपान करून आरडओरडा करीत होते. यात युवकांचा भरणा अधिक होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी सावंत यांनी या पर्यटकांची चौकशी केली व त्यांना सावंतवाडी येथे आणले. हे सर्व पर्यटक कोल्हापूर येथील असून पोलिसांनी या सर्वांना समज देण्याचे काम सुरू होते. पण कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. दर रविवारी वर्षा पर्यटनाच्या निमित्ताने आंबोलीत मद्यपान करून येणाऱ्या पर्यटकांच्या त्रासाला सामोरे जावे लागत असून अतिउत्साही पर्यटक तर पोलिसांच्या समोरच आरडाओरडा करीत पर्यटकांना त्रास देत असतात. असाच प्रकार आज घडला. पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी रविवारी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्याने जिल्ह्यातील तसेच सावंतवाडी व आंबोली पोलीस ठाण्याचे कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात केले आहेत. (प्रतिनिधी)