१७ जागांकरिता ४८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एकूण २१,८४० इतके मतदार असून, सहा प्रभाग आहेत. पाच प्रभागांत प्रत्येकी तीन, तर एका गटात दोन जागा, अशा एकूण १७ जागा आहेत. आजपर्यंत एकमेकांविरुद्ध लढणारे दोन्ही मातब्बर गट या निवडणुकीत एकत्र आले आहेत. आमदार डॉ. विनय कोरे, अमरसिंह पाटील व डॉ. जयंत पाटील यांनी अंबाबाई ग्रामविकास आघाडी केली आहे, तर माजी आमदार सत्यजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली किरण पाटील, धनाजी केकरे, डॉ. सुनील पाटील आदींनी कोडोली बचाव पॅनल केले आहे. दोन्ही गटांच्या अधिकृत उमेदवारांबरोबर १८ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. अपक्ष उमेदवार किती मतदान घेतात, यावरच अधिकृत उमेदवारांचे भवितव्य अवलबूंन आहे. उमेदवार सकाळ, संध्याकाळ गावात, तर दुपारच्या वेळेत शेतातील वाडीवस्तींवर जाऊन मतदारांना आपली भूमिका समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत.
................
वातावरण चांगलेच तापले
कोरे-पाटील गट एकत्र आल्याने सुरुवातीस एकतर्फी वाटणाऱ्या निवडणुकीत कोडोली बचाव पॅनल व अपक्षांनी प्रचारात आघाडी घेतल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. मतदारराजा कोणत्या उमेदवाराच्या गळ्यात विजयाची माळ घालतो, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
एकूण मतदार २१,८४०
एकूण प्रभाग ६
एकूण जागा १७