शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

नातीवर अत्याचार

By admin | Updated: September 24, 2016 00:50 IST

नराधमास अटक

कोल्हापूर : कनाननगर येथे घरात कोणी नसल्याचे पाहून ११ वर्षांच्या नातीवर अत्याचार केल्याच्या संशयातून रांगोळी (ता. हातकणंगले) येथील ६५ वर्षांच्या नराधम आजोबास शाहूपुरी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. अधिक माहिती अशी, पीडित मुलगी आई-वडील व लहान भाऊ यांच्यासमवेत कनाननगर येथे राहते. वडील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात गजरे, फुले, तर आई भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करते. दरम्यान, रांगोळी येथे राहणारा आजोबा गणेशोत्सव काळात कनाननगर येथे राहण्यास आला होता. १९ सप्टेंबरला आई-वडील व्यवसायानिमित्त बाहेर गेले होते. मुलगी व आजोबा असे दोघेच घरी होते. यावेळी दुपारी ती झोपलेली पाहून तिच्यावर आजोबाने अत्याचार केला. त्यानंतर घरी कोणाला सांगितलेस तर ठार मारण्याची धमकी मुलीला दिली. त्यामुळे भीतीने मुलीने घडलेला प्रकार सांगितला नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही तिच्यावर अत्याचार केला. रात्री आई-वडील घरी आल्यानंतर मुलगी रडत असल्याचे दिसून आले. त्यांनी तिच्याकडे विचारपूस केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. हे ऐकून त्यांना धक्काच बसला. त्यांनी या प्रकाराची माहिती जवळच्या नातेवाइकांना सांगितली. आपले पितळ उघड झाल्याने संशयित आजोबाने तेथून पलायन केले. मुलीच्या जीविताला धोका असल्याने अखेर मुलीच्या आईने सासऱ्याच्या विरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी संशयित नराधम आजोबाला रांगोळी येथील घरातून अटक केली. आज, शनिवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक विलास भोसले करीत आहेत. पश्चात्तापाचा लवलेश नाही पीडित मुलीची घरची परिस्थिती बेताची आहे. आई-वडील साधे असून, व्यवसायातून मिळणाऱ्या तुटपुंजा पैशातून ते उदरनिर्वाह चालवितात. संशयित आजोबाकडे पोलिस निरीक्षक प्रवीण चौगुले चौकशी करीत होते, त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा लवलेशही दिसत नव्हता. बाहेर मात्र पीडित मुलीचे आई-वडील अश्रू ढाळत होते.