शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

खेडमध्ये तुफानी पाऊस--रोहा तालुक्यात पूल वाहून गेला

By admin | Updated: September 23, 2016 00:34 IST

नद्यांना पूर : एकजण बेपत्ता; महामार्ग बंद;

खेड/रायगड : जोरदार पावसामुळे रोहा रामराजमार्गे अलिबाग या मार्गावरील झोळंबे कोपरा येथील छोटा पूल गुरुवारी सकाळी वाहून गेल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरम्यान, खेड तालुक्यात कालपासून मुसळधार पाऊस सुरू असून खेडमध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. खेड-दापोली मार्ग बंद झाला असून, नारिंगी आणि चोरद नदीला पूर आला आहे. यामुळे ४२ गावांचा संपर्क तुटला आहे. पावसाचे पाणी भरणे नाका येथील जगबुडी पुलावरून वाहू लागल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आल्याची माहिती तहसीलदारांनी दिली.तालुक्यात कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नारिंगी नदीला पूर आल्यामुळे खेड-दापोली मार्ग बंद झाला आहे, तर चोरद नदीला आलेल्या पुरामुळे ४२ गावांचा संपर्क तुटला आहे. पोलिस व प्रशासनाचे कर्मचारी किनाऱ्यावरील गावांकडे लक्ष ठेवून आहेत. बीजघर येथील एकजण नदीत वाहून गेला आहे. मात्र, याबाबत अधिक माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. महाड येथील सावित्री नदीवरील पूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिस व प्रशासनाने मुंबई-गोवा महामार्ग अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. खेड पोलिसांनी चिपळूच्या दिशेने जाणाऱ्या सर्व एस. टी. बसेस व इतर वाहने भरणे नाका येथे अडविल्या, तर चिपळूण पोलिसांनी चिपळूण येथे सर्व वाहने थांबवून ठेवली आहेत. पावसामुळे रोहा तालुक्यातील झोळंबे कोपरा येथील अंदाजे १२ फूट लांबीचा पूल गुरुवारी सकाळी वाहून गेला. सोनगाव येथील जेटीवरून होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे हा पूल कमकुवत झाला होता, असे येथील स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. या पाण्याने छोट्या पूलाला धडक दिल्याने तो वाहून गेला. चिपळूणमध्ये जनजीवन विस्कळीत चिपळूणमध्ये गेले चार ते पाच दिवस पावसाने हजेरी लावली असून, गुरुवारी दिवसभर मुसळधार पाऊस सुरू होता. गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत १२४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. -/ वृत्त हॅलो १