शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

शिरोळ संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:28 IST

शिरोळ : घालवाड (ता. शिरोळ) येथील सरनोबत परिवाराने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फुलाजीराव सरनोबत यांच्या निधनानंतर होणाऱ्या उत्तरक्रिया खर्चाला फाटा देत ...

शिरोळ : घालवाड (ता. शिरोळ) येथील सरनोबत परिवाराने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फुलाजीराव सरनोबत यांच्या निधनानंतर होणाऱ्या उत्तरक्रिया खर्चाला फाटा देत विधायक कामासाठी आर्थिक स्वरूपात मदत केली. सरनोबत परिवाराकडून १५ हजारांची रक्कम सरपंच इंद्रजित सरनोबत यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी शिवाजी थोरवत, उदय खोंद्रे, गिरीश कंदले, अजितसिंह सरनोबत, इंद्रजित सरनोबत, सुचिता वाघ, जगदीश सरनोबत, राजेंद्र सरनोबत, राजवर्धन सरनोबत, जीवन सरनोबत, प्रवीण सरनोबत उपस्थित होते.

-------------

राहुल काशीद पुरस्काराने सन्मानित

जयसिंगपूर : येथील राहुल काशीद यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सांगली येथे सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे, राजीव आवळे यांच्या हस्ते हा पुरस्कार काशीद यांना प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी ॲड. कुबेर शेडबाळे होते. काशीद यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन श्री साई समर्थ संस्थेच्या वतीने त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. याप्रसंगी अश्विनी जमाले, हिंदुराव ढवळे, संतोष ढवळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

फोटो - २३०९२०२१-जेएवाय-०२-राहुल काशीद

---------------------

कुरुंदवाडमध्ये रस्त्याची दुरुस्ती

कुरुंदवाड : शहरातील शिवतीर्थ चौकातील रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे शहरवासीयांतून समाधान व्यक्त होत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या रस्त्यामध्ये खड्डे पडले होते. त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. आंदोलकांनी देखील या रस्त्याप्रश्नी वारंवार आंदोलने केली होती. या आंदोलनाची दखल घेत पालिका प्रशासनाने या रस्त्याची दुरुस्ती केली आहे.