शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

टोलप्रश्नी सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी

By admin | Updated: February 19, 2015 00:22 IST

कोल्हापूरकरांत उत्सुकता : टोलवसुलीची बेकायदेशीर अधिसूचना रद्द करण्याची मागणी याचिकेत

कोल्हापूर : प्रकल्प अपूर्ण असताना शहरात सुरू असलेली टोलवसुली बेकायदेशीर आहे. शहरवासीयांवर लादलेला हा जाचक टोल रद्द करावा, या मागणीसाठी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने सर्वाेच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर २३ फेब्रुवारीला सुनावणी सुरू होणार असल्याचे अ‍ॅड. अभय नेवगी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे लेखी आदेश उद्या, शुक्रवारपर्यंत मिळतील, असे नेवगी यांनी स्पष्ट केले.मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी व न्या. ए. के. मेनन यांच्या खंडपीठाने कोल्हापुरातील टोलप्रश्नी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या तीन याचिका १४ आॅक्टोबर २०१४ रोजी फेटाळल्या. प्रकल्प पूर्ण असल्याची अद्याप शासनाने खात्री करण्याची तसदीही घेतलेली नाही. नेमके प्रकल्पाचे किती काम झाले, हे अजूनही स्पष्ट नाही. त्यामुळे टोलवसुलीची बेकायदेशीर अधिसूचना रद्द करावी, अशी मागणी याचिकेद्वारे सर्वाेच्च न्यायालयात केली आहे. (प्रतिनिधी)टोल हा टॅक्स की फी आहे, टॅक्स असेल तर तो शासनाकडे जमा होणे आवश्यक आहे. टोल रस्ते प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर की अपूर्ण असताना लावायचा याबाबत निर्णय व्हावा. प्रकल्प पूर्ण झाल्याची तपासणी करावी. एमएसआरडीसी व आयआरबी यांनी केलेल्या वाहनांच्या गणतीमध्ये तफावत आहे. महापालिकेने यापूर्वीही न्यायालयात प्रतिज्ञापत्रही सादर केले आहे. प्रकल्प अपूर्ण असताना केलेली टोलवसुली बेकायदेशीर आहे. त्यामुळे ही बेकायदेशीर टोलवसुली बंद करावी, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली आहे. - अ‍ॅड. अभय नेवगी सर्वाेच्च न्यायालयात मांडलेले मुद्दे१कराराचा भंग व त्रुटी, ‘आयआरबी’ला कवडीमोलाने दिलेली तीन लाख चौरस मीटरची जागा.२जागेच्या किमतीसाठी जाहीर निविदा का काढली नाही?, टोलसाठी जनतेचा असणारा विरोध.३अपूर्ण प्रकल्प, न्यायालयाच्या आदेशानुसार वृक्ष लागवड झाली नाही.४युटिलिटी शिफ्टिंग न केल्याने निर्माण झालेल्या अडचणी.