शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक अपघात! ट्रेन जात असताना स्कूल बस आडवी आली; चिंधड्या उडाल्या, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
2
MNS Morcha: मनसेचा मोर्चा रोखण्यासाठी पोलिसांची रात्रभर घरात घुसून धरपकड, मीरा भाईंदरमध्ये बंदोबस्त वाढवला
3
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
4
Stock Market Today: ५५ अंकांच्या घसरणीसह उघडला सेन्सेक्स; या दोन क्षेत्रांवर दबाव, बाजारात तेजी का दिसून येत नाहीये?
5
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
6
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
7
Viral Video: देव न दिसे देवळात, माझे पांडुरंग घरात; वारीतून पतललेल्या बापासाठी लेकीनं केलं असं काही, होतंय कौतुक!
8
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
9
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
10
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
11
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
12
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
13
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
14
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
15
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
16
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
17
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
18
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
19
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
20
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र

टोलविरोधी लढा, विद्यार्थ्यांना आवाहन

By admin | Updated: January 14, 2015 23:19 IST

निवास साळोखे : महावीर कॉलेजमध्ये व्याख्यान

कोल्हापूर : टोलमुक्ती हा कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. टोलमुक्त झाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही. राज्यात अडीच महिने झाले नवीन भाजप सरकार सत्तेवर आले आहे. त्यांनी टोलप्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले असले तरी अद्याप हा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे कोणत्याही स्थितीत टोल घालवणारच. त्यासाठी विद्यार्थ्यांनी साथ द्यावी, असे आवाहन आज, मंगळवारी सर्वपक्षीय टोल विरोधी कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांनी येथे केले. महावीर महाविद्यालयाच्या भूगोल विभागाच्या वतीने ‘कोल्हापूर शहर रस्ते विकास आणि टोल आंदोलन दशा व दिशा एक भौगोलिक अभ्यास’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. प्राचार्य संभाजीराव कणसे अध्यक्षस्थानी होते. डॉ. मंजिरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी नाथाजी पोवार उपस्थित होते.निवास साळोखे म्हणाले, विद्यार्थी दशेपासून आम्ही चळवळीत काम करीत आहोत. त्यामुळे टोल आंदोलन हे काय नवीन वाटत नाही. गेल्या पाच वर्षांत या आंदोलनातून समितीतील कार्यकर्त्यांवर दरोड्यासारखे गुन्हे पोलीस प्रशासनाने घातले. आम्ही तुम्हाला दरोडेखोर वाटतो का? असा प्रश्न करून ते म्हणाले, आय.आर.बी. कंपनी खंडणीप्रमाणे पैसे गोळा करत आहे. कंपनीला ठेका देण्यासाठी मंत्रालयापासून महापालिका आणि मंत्र्यांपासून ते शिपायापर्यंत अशी साखळी आहे. या साखळीद्वारे हा कारभार सुरू आहे. यातून मंत्री आपली दिवाळी तर कोल्हापूरकरांचा शिमगा होत आहे. गत काँग्रेस आघाडी सरकारमधील जिल्ह्णातील दोन मंत्री यांनी विधानसभेपूर्वी टोल पंचगंगेत बुडवू असे आश्वासन दिले होते. पण, त्यांनी टोल मुक्ती केली नाही. त्यांना जनतेने जागा दाखविली. परंतु, सध्या राज्यात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने अद्याप टोलमुक्तीचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे त्यांनीसुद्धा लवकरच टोलमुक्ती करावी अन्यथा त्यांना भविष्यात त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा साळोखे यांनी दिला.प्रा. डॉ. अरुण पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी विभागाचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. शशिकांत पाटील यांनी आभार मानले.