शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

‘आर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्स’तर्फे आज रंकाळ्याचे सर्वेक्षण--लोकमत इफेक्ट

By admin | Updated: February 13, 2015 00:45 IST

रंकाळ्याच्या दुरवस्थेबाबत ‘लोकमत’ने सातत्याने परखड लिखाण करीत जागृती केली

कोल्हापूर : शहराचे ऐतिहासिक सौंदर्य असलेला रंकाळा पर्यावरण व भौतिकदृष्ट्या नाश पावत आहे. रंकाळ्याची दुरवस्था दूर करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान पुरविण्याची तयारी असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस् अ‍ॅँड इंजिनिअर्स (कोल्हापूर) या बांधकाम क्षेत्रातील अग्रणी संस्थेने केली आहे. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत व संस्थेचे पदाधिकारी आज, शुक्रवारी साडेनऊ वाजता रंकाळा संवर्धनासाठी आवश्यक कारणांचा शोध घेण्यासाठी संयुक्त पाहणी करणार आहेत. रंकाळ्याच्या दुरवस्थेबाबत ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा करून जागृती केल्याबद्दल असोसिएशनने ‘लोकमत’चे खास अभिनंदन केले.गेल्या वर्षभरात रंकाळ्याची संरक्षक भिंत चारवेळा कोसळली. आणखी ७० ते ८० फुटांची भिंत कोसळण्याच्या मार्गावर आहे. पावसाळ्यापूर्वी ही संपूर्ण भिंत दुरुस्त न केल्यास रंकाळ्याचे पाणी बाहेर पडण्याचा धोका आहे. पाण्यातील काम करण्याचे तंत्रज्ञान महापालिकेजवळ नाही. दूषित पाणी मिसळल्याने प्रदूषणाचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. रंकाळ्याच्या संपूर्ण नैसर्गिक पुनर्भरणाची गरज आहे. महापालिकेने आजपर्यंत रंकाळा संवर्धनासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला. मात्र, रंकाळ्याचे दुखणे ‘जैसे थे’ आहे. आता महापालिका तज्ज्ञांकडून १६ लाख रुपयांचा विकास आराखडा तयार करणार आहे. पालिका प्रशासनाकडे याबाबतचे पुरेसे तंत्रज्ञान नसल्यानेच रंकाळ्याला अवकळा आली आहे.रंकाळ्याचे कोणत्याही परिस्थितीत पुनरुज्जीवन झालेच पाहिजे याच उद्देशाने कोल्हापूर येथील असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस् अ‍ॅँड इंजिनिअर्सने पालिका प्रशासनास मदतीचा हात देऊ केला आहे. यासाठी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांची भेट घेतली. यावेळी रंकाळ्याची संयुक्त पाहणी करून सविस्तर सर्वेक्षण अहवाल तयार करण्याचे ठरले.शहराचे वैभव असलेल्या रंकाळ्याचे संवर्धन होण्यासाठी सविस्तर सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. सर्वेक्षणानंतर असोसिएशनचे पदाधिकारी याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करून आठ दिवसांत महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांना सर्वेक्षण अहवाल सादर करणार आहेत. रंकाळा संवर्धनासाठी नेमके काय करणे गरजेचे आहे, हे या सर्वेक्षणानंतर स्पष्ट होईल. - संदीप घाटगे, अध्यक्ष,असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस् अ‍ॅँड इंजिनिअर्सरंकाळ्याच्या दुरवस्थेबाबत ‘लोकमत’ने सातत्याने परखड लिखाण करीत जागृती केली. रंकाळा संवर्धनाचे महत्त्व प्रशासन व नागरिंकांना पटवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, याबाबत असोसिएशनने ‘लोकमत’चे आभार मानले.