शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
2
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
3
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
4
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
5
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
6
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
7
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
8
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
9
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
10
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
11
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
12
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
13
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
14
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
15
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
16
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
17
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
18
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
19
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
20
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!

मुस्लिम मराठी साहित्य संमेलन आजपासून

By admin | Updated: May 21, 2016 01:00 IST

दिग्गज विचारवंतांचा सहभाग : विविध विषयांवरील चर्चासत्रे, वैचारिक मेजवानी

कोल्हापूर : मुस्लिम साहित्य चळवळीला २५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने मुस्लिम बोर्डिंग हाऊसतर्फे केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाला आज, शनिवारी सकाळपासून सुरुवात होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या या साहित्य सोहळ्यात दिग्गज विचारवंतांसह महाराष्ट्रभरातील विविध भागांतून आलेल्या लेखकांचाही सहभाग आहे. संमेलनानिमित्त विविध विषयांवरील चर्चासत्रे, परिसंवादांतून वाचकांना वैचारिक मेजवानीचा लाभ घेता येणार आहे.संमेलनाचे उद्घाटन सकाळी ११ वाजता डॉ. डी. वाय. पाटील यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटक अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची उपस्थिती राहील. स्वागताध्यक्ष म्हणून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, तर संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नाटककार व रंगकर्मी शफाअत खान लाभले आहेत. यावेळी महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला, आमदार राजेश क्षीरसागर, एम. सी. ए. सोसायटीचे अध्यक्ष पी. ए. इनामदार यांची प्रमुख उपस्थिती असेल. यावेळी मान्यवरांच्या हस्ते खलील पटेल यांनी अनुवाद केलेल्या ‘तीन तेरा’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. तसेच स्व. लीलावती काकडे यांच्या स्मरणार्थ आयोजित निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण होईल. दरम्यान, सकाळी १०.३० वाजता विविध हौशी कलाकारांच्या चित्रांचा व छायाचित्रांचा समावेश असलेल्या आबालाल रहेमान कलादालनाचे उद्घाटन खासदार संजय काकडे यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी २.३० वाजता ‘वर्तमान वास्तव आणि मुस्लिम मराठी साहित्य’ या विषयावरील परिसंवादात प्रा. डॉ. मैजुद्दीन मुतवल्ली, प्रा. डॉ. फारूख तांबोळी, प्रा. डॉ. पांडुरंग कंद, प्रा. डॉ. आरिफ शेख, प्रा. डॉ. गिरीश मोरे, प्राचार्य फारूक शेख हे वक्ते सहभागी होणार आहेत. अध्यक्षस्थानी साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर असतील.दुपारी चार वाजता ‘पर्यावरणविषयक प्रश्नांना आजचे साहित्य भिडते आहे काय?’ या विषयावरील परिसंवादात आमदार पाशा पटेल, विलास सोनवणे, प्रा. डॉ. महेंद्र कदम, डॉ. एम. सी. शेख हे वक्ते आपले विचार मांडणार आहेत. परिसंवादाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार हे भूषविणार आहेत. सायंकाळी सात वाजता हिंदी चित्रपट गीतकार समीर यांच्याशी मुक्त संवाद होणार आहे. यावेळी रियाज शेख, असिफ जमादार-शेख त्यांच्याशी संवाद साधतील. रात्री आठ वाजता कविसंमेलन होणार असून विविध भागांतून आलेले निमंत्रित कवी आपल्या रचना सादर करणार आहेत. अध्यक्षस्थानी सय्यद अल्लाउद्दीन असतील. संमेलनाचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. (प्रतिनिधी)