शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

सर्किट बेंचसाठी आज महारॅली

By admin | Updated: September 10, 2015 01:25 IST

शाळाही सहभागी होणार : आजचा कोल्हापूर बंद यशस्वी करण्याचा सर्वपक्षीयांचा निर्धार

कोल्हापूर : सर्किटबेंचच्या मागणीसाठी आणि माजी मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांच्या निषेधार्थ आज, गुरुवारी पुकारण्यात आलेला बंद यशस्वी करण्याचा निर्धार खंडपीठ कृती समितीच्यावतीने आयोजित ठिय्या आंदोलनावेळी करण्यात आला. या बंदला सर्वपक्षीय संघटनांनी एकमुखाने पाठिंबा जाहीर केला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवून आजच्या महारॅलीत सहभागी होण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी मंगळवारी कोल्हापुरात ‘सर्किट बेंच’ स्थापन करण्याबाबत निर्णय न घेता सेवानिवृत्ती घेतली. त्यामुळे गेल्या ३० वर्षांपासून सुरू असलेल्या ‘सर्किट बेंच’चा प्रश्न पुन्हा प्रलंबित राहिला. याच्या निषेधार्थ वकिलांनी काल मोहित शहा यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून त्यांच्या पुतळ्याचे दहन केले होते. तसेच कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सोलापूर या सहा जिल्ह्यांत बुधवारपासून तीन दिवस न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा आणि गुरुवारी कोल्हापूर बंद पुकरण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार बुधवारी सहाही जिल्ह्यांतील वकिलांनी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकला त्यामुळे सुमारे आठ हजार खटल्यांचे कामकाज ठप्प झाले. कोल्हापुरातही न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकून वकिलांनी कृती समितीच्या नेतृत्वाखाली वकिलांनी जिल्हा न्यायालयासमोर उभारण्यात आलेल्या शामियान्यात सर्व वकिलांनी बुधवारी सकाळी एकत्र येऊन निषेध केला. त्यानंतर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी महापौर वैशाली डकरे, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते दिलीप पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर, चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष आनंद माने, टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवासराव साळोखे, नगरसेवक राजेश लाटकर, शारंगधर देशमुख, बाबा इंदुलकर, शिवसेना शहराध्यक्ष दुर्गेश लिंग्रस, मनसे वाहतूक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव, माजी महापौर सुनील कदम, हॉटेलमालक संघाचे जगदाळे, शेतकरी संघटनेचे पी. जी. पाटील, सिटिझन फोरमचे प्रसाद पाटील, प्रजासत्ताक संघटनेचे दिलीप देसाई, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सदानंद कोरगावकर, हिंदू एकताचे चंद्रकांत बराले, स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष व्ही. डी. माने, सुंदरराव देसाई, आदींनी आंदोलनस्थळी भेट देऊन रॅलीत सहभागी होण्याची ग्वाही दिली. आंदोलनाचे नियोजन समितीचे निमंत्रक राजेंद्र चव्हाण, अ‍ॅड. प्रशांत चिटणीस, रवींद्र जानकर, शिवाजीराव राणे, अजित मोहिते, माणिक मुळीक, धनंजय पठाडे, आदींनी केले. १५ हजार विद्यार्थी होणार सहभागी खंडपीठ कृती समितीने आज, गुरुवारी ‘कोल्हापूर बंद’ पुकारला आहे. त्याला बुधवारी सर्वपक्षियांनी एकमुखाने पाठिंबा जाहीर केला. जिल्हा न्यायालय येथून सकाळी अकरा वाजता महारॅली काढण्यात येणार आहे. त्यामध्ये लोकप्रतिनिधींसह राजकीय-सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, वाहतूक संघटनांसह शाळा-महाविद्यालये बंद ठेवून १५ हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. यावेळी अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यातील सर्व व्यवहार बंद ठेवले जाणार आहेत.