शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
2
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
3
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
4
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
5
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
6
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
7
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
8
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
9
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
10
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
11
‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय
12
अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला
13
प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 
14
Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात
15
Operation Sindhu: इराण, इस्रायलमधून आणखी १,१०० भारतीय मायदेशात, विमान कंपन्यांची मध्य-पूर्वेतील उड्डाणे थांबली
16
आरोग्यसेवेचे मोल शून्य; राज्यातील ३२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा २ महिन्यांचा पगार थकला
17
एसीबीच्या अहवालामुळे  सिडको प्रशासन हादरले, कार्मिक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
18
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
19
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
20
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम

अपात्रतेला आज आव्हान देणार

By admin | Updated: May 11, 2016 00:43 IST

माजी नगरसेवक, कार्यकर्ते मुंबईत : हायकोर्टात स्वतंत्र याचिका दाखल करणार

कोल्हापूर : जातीचा दाखला अवैध ठरल्याने महापौर आणि नगरसेवकपद गमवावे लागलेल्या अश्विनी रामाणे, दीपा मगदूम, संदीप नेजदार, सचिन पाटील यांनी उच्च न्यायालयाकडून जातपडताळणी समितीच्या निर्णयाला स्थगिती आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आज, बुधवारी यासंदर्भात वेगवेगळ्या याचिका दाखल होणार असून, मंगळवारी त्याची तयारी करण्यात बहुसंख्य कार्यकर्ते व्यस्त होते. दि. १६ मेपर्यंत या याचिकेवर काहीतरी निर्णय होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सोमवारी विभागीय जातपडताळणी समितीने अश्विनी रामाणे यांच्यासह दीपा मगदूम, सचिन पाटील यांचा जातीचा दाखला अवैध ठरविल्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस गोटात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली असून या कारवाईला उच्च न्यायालयातून स्थगिती मिळविण्यासाठी रात्रीच काही नगरसेवक, त्यांचे कार्यकर्ते मुंबईला पोहोचले. याचिका दाखल करण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची जमवाजमव करण्यात तसेच प्रतिज्ञापत्रे तयार करण्यात मंगळवारचा दिवस गेला. आज, बुधवारी न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल होतील. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी याचिका दाखल करण्यासंदर्भात मदत केली आहे. नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांनी सांगितले की, जातपडताळणी समितीने केलेली कारवाई ही चुकीची आहे. त्याला आव्हान देण्यासाठी बुधवारी न्यायालयात याचिका दाखल होतील. प्रत्येकाची केस वेगळी असल्याने स्वतंत्रपणे याचिका दाखल केल्या जाणार आहेत. ज्या समितीच्या सदस्या वृषाली शिंदे होत्या त्यांनी सचिन पाटील यांच्या भावाचा ‘कुणबी’ जातीचा दाखला वैध ठरविला आहे, परंतु त्याच शिंदे यांनी सचिन पाटील यांचा दाखला अवैध ठरविला. ही बाब अन्यायकारक आहे. आमच्या सर्व नगरसेवकांना न्यायालयाकडून न्याय मिळेल अशी आमची आशा आहे.महापौर निवडीसाठी तारखेची मागणीअश्विनी रामाणे यांना महापौरपदावरून पायउतार व्हावे लागल्याने महापालिका प्रशासनाने नवीन महापौर निवड घेण्यासाठी तारीख निश्चित करून द्यावी म्हणून पुणे विभागीय आयुक्तांना अहवाल पाठविला आहे. दोनच दिवसांत तारीख निश्तिच होऊन मिळताच नव्या महापौर निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे महापालिका सूत्रांनी सांगितले. पालकमंत्रीच खरे सूत्रधारकॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना जातीचे दाखले मिळू नयेत म्हणून आधी प्रयत्न केले गेले. त्यासाठी शासकीय यंत्रणेवर प्रचंड दबाव आणला होता. त्यातूनही ते दाखले आमच्या नगरसेवकांना मिळाले. त्यामुळे अस्वस्थ झालेले पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विभागीय जातपडताळणी समितीवर दबाव टाकून जातीचे दाखलेच अवैध ठरविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या प्रकरणात खरे सूत्रधार हे ‘दादा’च आहेत, असा आरोप प्रा. जयंत पाटील यांनी केला. आमच्या पक्षाच्या नगरसेवकांचे जातीचे दाखले रद्द होताच पालकमंत्री पाटील यांनी ‘आता भाजपचाच महापौर होईल, महापालिकेत आमचीच सत्ता येईल’ असा दावा करत आहेत. याचा अर्थ या सगळ्या प्रकरणात दादाच असल्याचा आमचा समज झाला आहे. त्यांनीच कट रचून जातीचे दाखले रद्द करून आमच्या आघाडीला अल्पमतात आणण्याचा जाणीवपूर्वक केलेले षङ्यंत्र आहे, असे प्रा. पाटील यांनी सांगितले.कॉल डिटेल्स तपासण्याची मागणी करणार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे गेल्या पंधरा दिवसांत कोणाला कॉल झाले याची तपासणी करावी, अशी मागणीच आम्ही न्यायालयाकडे करणार असल्याचे प्रा. पाटील यांनी सांगितले. ज्यावेळी नगरसेवकांच्या जातीच्या दाखल्यांच्या पडताळणीचे काम सुरू होते. त्यावेळी समितीचे सदस्य मधूनच तास दोन तासांसाठी गायब होत होते. ते का आणि कुठे जात होते याची तपासणी झाली पाहिजे. त्यांना कुणाचे फोन आले होते याची तपासणी करावी. पालकमंत्र्यांनी समितीच्या अध्यक्ष व सदस्यांना फोन केले असतील तर त्यांची तपासणी केली पाहिजे म्हणूनच तशी मागणी न्यायालयाकडे करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.