शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी आजपासून पाच रुपयांत जेवण

By admin | Updated: May 1, 2017 00:12 IST

सांगली बाजार समितीचा उपक्रम : पालकमंत्री, कृषी राज्यमंत्र्यांच्याहस्ते योजनेस प्रारंभ होणार

सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने बीडच्या धर्तीवर अवघ्या पाच रुपयांत शेतकऱ्यांना जेवण देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाचा प्रारंभ महाराष्ट्रदिनी पालकमंत्री सुभाष देशमुख व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याहस्ते होत आहे. जिल्ह्यासह परराज्यातून मार्केट यार्डात येणाऱ्या दररोज पाचशेवर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. पतंगराव कदम आहेत. यावेळी खासदार संजयकाका पाटील, खा. राजू शेट्टी, आमदार मोहनराव कदम, सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, माजी मंत्री अजितराव घोरपडे, प्रतीक पाटील, महापौर हारूण शिकलगार, जयश्रीताई मदन पाटील, विशाल पाटील, दिनकरतात्या पाटील, संभाजी पवार, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, पणनचे कार्यकारी संचालक डॉ. किशोर तोष्णीवाल, विभागीय सहनिबंधक धनंजय डोईफोडे, सरव्यवस्थापक मिलिंद आकरे उपस्थित राहणार आहेत. सांगलीची हळद, गूळ आणि बेदाण्याची प्रमुख बाजारपेठ आहे. मार्केट यार्डात जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह परराज्यातील शेतकरी शेतीमालाच्या विक्रीसाठी येतात. दररोज किमान पाचशे शेतकरी मार्केट यार्डात येत असतात. याशिवाय हंगामात त्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांची संख्या असते. ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांची सांगलीत जेवणाची गैरसोय होत असते. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांना अवघ्या पाच रुपयांत पोटभर जेवण देण्याचा निर्णय घेतला आहे. बाजार समिती आणि अडते यांच्याकडून जेवणासाठी येणारा हा खर्च केला जाणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या जेवणासाठी तीस रुपये खर्च येत असला तरी, त्यांच्याकडून अवघे पाच रुपयेच घेतले जाणार आहे. उर्वरित रक्कम सांगली बाजार समितीकडून खर्च केली जाईल. सध्या काही शेतकऱ्यांना व्यापारी जेवण देतात, मात्र अनेक शेतकऱ्यांचे जेवणासाठी हाल होत असल्याचेही दिसून आले आहे. शेतकऱ्यांना जेवण देण्याच्या निर्णयास सांगली बाजार समितीच्या संचालक मंडळाने सहमती दर्शविली. आता हा उपक्रम सुरू होणार आहे. (प्रतिनिधी)बीड बाजार समितीच्या धर्तीवर प्रयोगबीड कृषी बाजार समितीच्यावतीने शेतकऱ्यांना पाच रुपयांत जेवण दिले जाते. त्याच धर्तीवर सांगली बाजार समितीने धाडसी निर्णय घेतला आहे. जेवणामध्ये चपाती, भाजी, आमटी, भात असा मेनू राहणार आहे. बाहेरुन येणाऱ्या शेतकऱ्यांचे जेवणाअभावी हाल होणार नाहीत, याची दक्षता घेतली जाणार असल्याचे बाजार समिती प्रशासनाने सांगितले.