शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांच्या उमेदवारांना ‘टिप्स’

By admin | Updated: October 6, 2015 00:58 IST

भाजप-ताराराणी आघाडी : उमेदवारी डावलल्याने चावरे, बसुगडे, खोतही अन्य पक्षांच्या संपर्कात

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी उमेदवारांना शास्त्रशुद्ध माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी भाजप-ताराराणी आघाडीच्या उमेदवारांना महायुतीच्या नेत्यांकडून सोमवारी विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले. नागाळा पार्क येथील जयलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे महायुतीच्या उमेदवारांची पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. प्रमुख उपस्थिती आमदार अमल महाडिक, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव, ताराराणी आघाडीचे अध्यक्ष स्वरुप महाडिक, सुनील मोदी, सुनील कदम, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए)चे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे आदींची होती.यावेळी प्रोजेक्टरच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज आॅनलाईन पद्धतीने कसा भरायचा याची माहिती उपस्थितांना देण्यात आली. अर्ज भरताना कोणती कागदपत्रे लागणार आहेत, आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, मतदारांसमोर आत्मविश्वासाने सामोरे जावे. आपल्या पक्षाचा अजेंडा व आपण काय करणार याची माहिती मतदारांशी संवाद साधताना द्यावी, असे मार्गदर्शन यावेळी नेत्यांकडून करण्यात आले. सुमारे चार तास चाललेल्या या बैठकीला उमेदवारांची गर्दी दिसत होती.दरम्यान, ताराराणी-भाजप महायुतीच्या गोटात बऱ्याच हालचाली झाल्या. यापूर्वी ७९ उमेदवारांची यादी जाहीर झाली असून उर्वरित दोन उमेदवारांची नावे सोमवारी जाहीर होतील, अशी शक्यता होती परंतु त्याबाबत घोषणा होऊ शकली नाही. आज, मंगळवारी हनुमान तलाव व लक्ष्मी-विलास पॅलेस या कसबा बावड्यातील दोन प्रभागांतील उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार आहे.दुधाळी पॅव्हेलियन प्रभागातून भाजप-ताराराणीची उमेदवारी जाहीर झालेले हेमंत कांदेकर यांना थांबवून प्रतापसिंह जाधव यांना उमेदवारी देण्याविषयी हालचाली झाल्याचे समजते. या वृत्ताचा कांदेकर यांनी इन्कार केला आहे तसेच भाजप-ताराराणी आघाडीकडून रंकाळा स्टॅँडमधून उमेदवारी डावलेले माजी नगरसेवक संभाजी बसुगडे हे दुधाळी पॅव्हेलियन प्रभागातून अन्य पक्षातून रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. राजलक्ष्मीनगर प्रभागातून उमेदवारी डावलेले वर्षा रमेश चावरे व शासकीय मध्यवर्ती कारागृह प्रभागामधून डावलेले शालन शामराव खोत हेसुद्धा अन्य पक्षाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)रमेश पुरेकर राष्ट्रवादीच्या संपर्कातसाईक्स एक्स्टेंशन प्रभागातून ताराराणी आघाडीकडून उमेदवारी डावलल्याने माजी नगरसेवक रमेश पुरेकर यांनी राष्ट्रवादीशी संपर्क साधल्याची चर्चा होती. त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची शासकीय विश्रामगृह येथे भेट घेऊन चर्चा केल्याचे समजते तसेच ताराराणी आघाडीकडून डावलेले दुसरे उमेदवार व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांचे पुतणे अनिरुद्ध पाटील यांच्या उमेदवारीसंदर्भात फेरविचार करण्याबाबतही आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते येथून ताराराणी आघाडीकडून कुलदीप देसाई यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. ते खासदार धनंजय महाडिक यांचे समर्थक आहेत.