शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘शाहू’विचार सर्वतोपरी पोहोचवा

By admin | Updated: June 26, 2015 00:59 IST

धनंजय महाडिक : राजर्षी शाहू अँड्रॉईड अ‍ॅप्लिकेशनचे उद्घाटन

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांच्या उत्तुंग सामाजिक कार्याची ओळख आजच्या पिढीला होणे गरजेचे आहे. राजर्षी शाहंूचा विचार जगभर पोहोचविण्याच्या हेतूने राकेश व रफी या दोघांनी अँड्रॉईड अ‍ॅप्लिकेशन तयार केले आहे. युवकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शाहूंचा विचार सर्वतोपरी पोहोचवावा, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. राजर्षी शाहू जयंतीचे औचित्य साधून कोल्हापुरातील राकेश मधाळे व रफी मोकाशी या तरुणांनी 'राजर्षी शाहू अ‍ॅँड्रॉईड अ‍ॅप्लिकेशन' तयार केले आहे. त्याचा गुरुवारी शाहू स्मारक भवन येथे खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.यावेळी खासदार महाडिक म्हणाले, सध्या माहिती तंत्रज्ञानाच्या मायाजाळात डिजिटल तंत्रज्ञानास फार महत्त्व आले आहे. या तरुणांनी राजर्षी शाहूंच्या कार्याची ओळख करून देण्यासाठी स्मार्टफोनच्या माध्यमाचा वापर केला आहे. त्यांचा हा विचार कौतुकास्पद आहे. राजर्षी शाहूंचा विचार सर्वतोपरी पोहोचविण्यासाठी ‘युवाशक्ती’च्या माध्यमातून पुढाकार घेतला जाईल, अशीही ग्वाही त्यांनी यावेळी दिली. अ‍ॅप्लिकेशनबद्दल बोलताना राकेश मुधाळे म्हणाले, मी आणि रफी मोकाशी यांनी राजर्षी शाहू महाराजांचा विचार सर्वतोपरी पोहोचविण्यासाठी हे अ‍ॅँड्रॉईड अ‍ॅप्लिकेशन तयार केले आहे. अ‍ॅप्लिकेशन मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये आहे. यात राजर्षी शाहू महाराजांविषयी थोडक्यात महत्त्वाची माहिती आहे. तसेच दुर्मीळ अशी छायाचित्रेही यामध्ये आहेत. यात कोल्हापू्रच्या पर्यटनाचा तपशीलसुद्धा आहे. हे अ‍ॅप्लिकेशन आॅनलाईन व आॅफलाईन दोन्ही पद्धतींनी कार्यरत राहू शकते. याप्रसंगी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, डॉ. पद्मा पाटील, प्राचार्य अजेय दळवी, पूनम दळवी, विजय टिपुगडे, फँटासॉफ्ट स्टुडिओचे रफी मोकाशी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)