शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या तीन सदस्यांना आमदारकीची लॉटरी

By admin | Updated: October 22, 2014 00:26 IST

मनी मंत्रालयातील कित्येक सदस्य यापूर्वी विधानसभेत पोहोचले. त्यांचाच कित्ता तीन सदस्यांनी गिरवला आहे.

कोल्हापूर : जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा केलेले तीन सदस्य आता आमदार झाले आहेत. विद्यमान सदस्य अमल महाडिक भारतीय जनता पक्षाकडून, तर माजी सदस्य प्रकाश आबिटकर व सत्यजित पाटील-सरूडकर शिवसेनेतून आमदार झाले आहेत. ‘जिल्हा परिषद ते विधानसभा’ असा त्यांचा राजकीय आलेख उंचावला आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यासह विविध सहकारी संस्था राजकारणातील कार्यशाळा म्हणून मानली जाते. राजकीय करिअर करू इच्छिणारे येथूनच निवडणुकीच्या फडात उडी टाकतात. जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर मतदारसंघांतील वाड्या-वस्त्यांवर संपर्क वाढतो. राज्य आणि केंद्राच्या अनेक योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविल्या जातात. त्यामुळे मतदारसंघातील जनतेशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे संपर्क येतो. क्रियाशील, प्रभावी काम करण्याची शैली असलेले सदस्य जिल्हा परिषद मतदारसंघासह तालुका, विधानसभा मतदारसंघ यामध्ये स्वत:ची ओळख अणि गट निर्माण करतात. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरतात. प्रसंगी ज्यांचे बोट धरून राजकारणात चंचुप्रवेश करतात अशा आपल्या गुरूंच्या विरोधात नंतर शड्डू ठोकतात. गुरूंना हरवून आमदार होतात, असा जिल्हा परिषद सदस्यांचा आजवरचा इतिहास आहे. जिल्हा परिषद सदस्य दिनकरराव जाधव, उदयसिंहराव गायकवाड यांनी आमदार व खासदारकीपर्यंत मजल मारली. बाळासाहेब माने जिल्हा परिषद अध्यक्ष होत. पुढे तेही खासदार झाले होते. सदाशिव मंडलिक, नरसिंगराव पाटील, भरमू पाटील, बाबा कुपेकर यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. त्यातील भरमू पाटील यांनी मंत्री म्हणून, तर कुपेकर यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून काम केले. हसन मुश्रीफ यांनी पंचायत समिती सभापती म्हणून काम केले आहे. सभापती जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात. ते आता चौथ्यांदा आमदार झाले आहेत. खासदार राजू शेट्टी हेही जिल्हा परिषदेचे सदस्य होते. सदस्यपदाचा कार्यकाल संपण्यापूर्वीच शेट्टी आमदार झाले. आमदारकीचा कार्यकाल संपण्यापूर्वीच खासदार झाले. या विधानसभा निवडणुकीत विद्यमान सदस्य अमल महाडिक, माजी सदस्य आबिटकर, पाटील-सरूडकर आमदार झाले आहेत. (प्रतिनिधी)मनी मंत्रालयातील कित्येक सदस्य यापूर्वी विधानसभेत पोहोचले. त्यांचाच कित्ता तीन सदस्यांनी गिरवला आहे.एका सदस्याचा पराभव...गडहिंग्लज तालुक्यातील अप्पी पाटील जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढवली. मात्र, राष्ट्रवादीच्या संध्यादेवी कुपेकर यांनी त्यांचा पराभव केला. त्यामुळे जिल्हा परिषद सभागृहातून विधानसभेत जाण्याची त्यांची संधी हुकली.