गारगोटी: गारगोटी बसस्थानकावर एस. टी. बसमधून उतरताना पर्समध्ये ठेवलेली रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा सुमारे पावणेचार लाख रुपयांचा मुद्देमाल अज्ञात महिलेने पर्सची साखळी तोडून लांबविले. अज्ञात चोर महिलेच्याविरोधात शोभा पारळे यांनी भुदरगड पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. अधिक माहिती अशी शोभा मारुती पारळे (वय ३४, व्यवसाय - घरकाम, मूळ गाव रा. खेडे, मडिलगे, ता. आजरा, जि.
कोल्हापूर सध्या रा. विरार कालगीर मनवेल पाडा शिर्डीनगर चाळ रूम नंबर १२ सी विंग, मुंबई) या रविवारी(दि.१४) दुपारी सव्वा एकच्या सुमारास एस. टी. स्टॅन्ड गारगोटी येथे एस टी बसमधून उतरताना अंदाजे ३५ ते ४० वयाची जाड काळ्या रंगाची महिला तिच्या अंगावर
काळ्या रंगाची साडी होती. साडीचा पदर लाल रंगाचा होता अशा वर्णनाच्या अज्ञात महिलेने पारळे यांच्या जवळील पर्सची चेन तोडून पर्समधील रोख रक्कम आणि दागिने मिळून सुमारे तीन लाख ७५हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. अधिक तपास पोलीस निरीक्षक कांकाळ करत आहेत.