शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

‘ते’ तीन कोटी कोल्हापूर जिल्ह्यातील!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2016 08:36 IST

धागेदोरे हाती : रक्कम चोरीचीच असल्याचे स्पष्ट; स्टेट बँकेत जमा; तपास अंतिम टप्प्यात

सांगली : मिरजेतील बेथेलहेमनगर येथे एका भाडेकरुच्या घरात सापडलेल्या तीन कोटी रकमेच्या घबाडाच्या तपासाला सोमवारी वेगळीच कलाटणी मिळाली. अटकेत असलेल्या मोहिद्दीन ऊर्फ मैनुद्दीन मुल्ला याने ही रोकड कोल्हापूर जिल्ह्यातून चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. यासंदर्भात महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. ही रक्कम कोठून व कधी चोरली, यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, यासंदर्भात माहिती घेण्याचे काम सुरू आहे. येत्या एक-दोन दिवसांत याचा उलगडा केला जाईल, असे पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांनी सांगितले. दरम्यान, ही रोकड भारतीय स्टेट बँकेत जमा करण्यात आली आहे. जाखले (ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) येथील मैनुद्दीन मुल्ला याने प्रेमविवाह केल्यानंतर, तो मिरजेतील बेथेलहेमनगरमधील त्याची मेहुणी रेखा भोरे हिच्याकडे राहत होता. अचानक त्याच्या राहणीमानात बदल झाल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने त्याच्यावर लक्ष केंद्रित केले होते. गेल्या आठवड्यात त्यास शहरात बुलेटवरून फिरताना पकडले होते. त्याच्या झडतीत सव्वालाख रुपये सापडले होते. बेथेलहेमनगरमध्ये त्याच्या घरावर छापा टाकल्यानंतर सुमारे तीन कोटी सात लाख ६३ हजार पाचशे रुपयांचे घबाड घरात सापडले होते. सुरुवातीला त्याने एका ‘टिपर’च्या मदतीने कर्नाटकातील एका खासदाराच्या संस्थेची ही रक्कम चोरल्याची कबुली दिली होती. त्यानुसार पथक चिक्कोडीत जाऊन आले, पण चोरीची अशी कोणतीही घटना तेथे घडली नसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार करीत होते. पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने ही रक्कम कोल्हापूर जिल्ह्यातून चोरल्याची कबुली दिली. कोल्हापूर जिल्ह्यात नेमकी कोठून रक्कम चोरली? याचाही उलगडा झाला आहे. त्यासंदर्भातील धागदोरे हाती लागले आहेत. रक्कम चोरलेले हे ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यातील असले तरी, ते सांगलीपासून जवळ आहे. मात्र, अजूनही यातील काही मुद्दे तपासातून स्पष्ट झालेले नाहीत. हे मुद्दे बारकाईने तपासण्याचे काम सुरू आहे. तपासाबाबत कमालीची गोपनियता बाळगण्यात आली आहे. त्यामुळे रक्कम चोरीचे ठिकाण सांगण्यास नकार दिला जात आहे. तपास सुरू आहे, तो अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या एक-दोन दिवसांत याचा संपूर्ण छडा लावला जाईल. आणखी कोणाचा यात सहभाग आहे का? हे तपासण्याचे काम सुरू आहे, असे निरीक्षक घनवट यांनी सांगितले. (प्रतिनिधी)