शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
6
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
7
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
8
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
9
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
10
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
11
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
12
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
13
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
14
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
15
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
16
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
17
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
18
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
19
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
20
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...

बॅँका बंदमुळे दीडशे कोटींची उलाढाल ठप्प

By admin | Updated: February 21, 2017 23:47 IST

इचलकरंजी शहर : पूर्वघोषणा नाही, हजारोंहून अधिक धनादेशांचे समाशोधन बंद

इचलकरंजी : कोणतीही पूर्व घोषणा नसताना मंगळवारी शहरातील राष्ट्रीयीकृत, सहकारी व खासगी बॅँका बंद राहिल्या. परिणामी, दररोज धनादेशाद्वारे होणारी सुमारे १५० कोटींहून अधिक रकमेची उलाढाल ठप्प झाली. तीन सहकारी व दोन राष्ट्रीयीकृत अशा पाच बॅँका मात्र दुपारपर्यंत सुरू होत्या.इचलकरंजी हे वस्त्रोद्योगाचे शहर असल्यामुळे दररोज येथे सूत खरेदी व कापड विक्री करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, कोलकाता अशा परपेठांमध्ये येथून विक्री केलेले कापड जात असते, तर तमिळनाडू, आंध्र प्रदेश, सिल्वासा, गुजरात, आदी राज्यांतून इचलकरंजीत सूत येत असते. अशा सुताची व कापडाची कोट्यवधी रुपयांची उलाढाल रोज होते. नोटाबंदी झाल्यापासून सूत व कापडाच्या खरेदी-विक्रीमध्ये होणारे रोखीचे व्यवहार बंद झाले असून, धनादेशाद्वारे होणाऱ्या खरेदी-विक्रीमध्ये तिप्पट वाढ झाली आहे. परिणामी, १५० कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल केवळ धनादेशाद्वारे होत असल्याची माहिती सूत व कापड व्यापाऱ्यांकडून देण्यात आली. मंगळवारी अचानक बॅँका बंद राहिल्याने हजारोंहून अधिक धनादेशांचे समाशोधन झाले नाही. भारतीय स्टेट बॅँकेच्या येथील शाखेमध्ये होणारे समाशोधन बंद राहिल्याने त्याचा १५० कोटींचा फटका वस्त्रनगरीला बसला आहे. (प्रतिनिधी)ग्राहक धास्तावलेचालू आठवड्यामध्ये २४, २५ व २६ फेब्रुवारीला सलग सुट्या आल्यामुळे आणि मंगळवारी अचानक सुटी पडल्याने आज, बुधवारी व उद्या गुरुवारी बॅँकांमध्ये गर्दी होणार आहे. शुक्रवारी आठवडी बाजार असल्याने त्यादिवशी पगाराची रक्कम काढण्याबाबत यंत्रमागधारकांची कोंडी होण्याची शक्यता आहे.