शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

संस्था मोडणाऱ्यांनी पारदर्शकतेच्या गप्पा मारू नये

By admin | Updated: May 1, 2015 00:31 IST

एम. आर. पाटील : साडेसहा वर्षे कौतुक करणाऱ्यांना आता दोष कसे दिसले?

राजाराम लोंढे - कोल्हापूर -मागील पंचवार्षिकमध्ये ज्यांनी जिल्हा परिषद सोसायटीला कुलूप लागण्यासारखी अवस्था केली, तेच टोळके आमच्यावर आरोप करत आहेत. त्यांना पारदर्शकतेच्या गप्पा कारण्याचा नैतिक अधिकार नाही. मूळ अंदाजपत्रकाशिवाय लिफ्टसह इतर खर्च वाढल्याने इमारतीचा खर्च वाढला; पण प्रत्येक गोेष्टीत ‘अर्थ’ शोधणाऱ्यांना सगळे पिवळेच वाटत असल्याचा पलटवार सोसायटीचे अध्यक्ष व महालक्ष्मी सहकार सत्तारूढ पॅनेलचे नेते एम. आर. पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. पाटील म्हणाले, इमारतीच्या मूळ अंदाजपत्रकात नसलेला लिफ्ट, जनरेटर, विद्युतीकरण, संरक्षणभिंत, सुशोभीकरण, फर्निचर, आदी बाबींवर ८४ लाख खर्च झाल्याने इमारतीचा खर्च वाढला. वाढीव खर्चाला सर्वसाधारण सभा व संचालक मंडळ बैठकीत रितसर मान्यता घेतली. टोलेजंग इमारत उभी करताना प्रत्येक गोष्टीत काटकसर केली. इमारतीच्या विविध भाड्यापोटी वर्षाला ३२ लाख रुपये उत्पन्न आहे. खोडसाळपणाने आरोप करून चांगल्या संस्थेला बदनाम करण्याचे षङ्यंत्र काही मंडळी करत आहेत. सभासदांच्या पात्र मुलांना त्यांच्या गुणवत्तेनुसार कर्मचारी भरतीत संधी दिली. पारदर्शक काम केले म्हणूनच सातत्याने ‘अ’ वर्ग मिळाला.संस्था बदनाम करणाऱ्यांना सभासदच उत्तर देतीलगेले साडेसहा वर्षे स्वत:च्या कुटुंबाप्रमाणे सोसायटीसाठी वेळ दिला. संचालक मंडळ, सुकाणू समिती, सभासद व ठेवीदारांच्या सहकार्याने डबघाईला आलेल्या संस्थेला ऊर्जितावस्थेत आणले. संस्थेच्या प्रगतीबाबत सर्वसाधारण सभेसह सर्वच कार्यक्रमांत सभासदांनी कौतुक केले. मंत्रिमहोदयांनी संचालकांच्या पाठीवर थाप मारली, एवढे करूनही केवळ विरोधाला विरोध म्हणून संस्थेची बदनामी करणाऱ्यांना सभासदांनीच चोख उत्तर द्यावे, असे भावनिक आवाहन एम. आर. पाटील यांनी केले.