शहरं
Join us  
Trending Stories
1
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
2
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
3
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
5
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
6
IND W vs ENG: स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा टी२० क्रिकेटमधील सुपरहिट जोडी, रचला नवा इतिहास!
7
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
8
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
9
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
10
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
11
स्वप्नांना पंख मिळाले! कठोर परिश्रमाने घातली आकाशाला गवसणी; आता नौदलात होणार अधिकारी
12
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या
13
ENG vs IND : टीम इंडियाचा बचावात्मक पवित्रा? प्लेइंग इलेव्हनमध्ये या तिघांची एन्ट्री
14
पावसाचं थैमान, मृत्यूचे तांडव! रस्ते खचले, घरं पडली; 51 जणांचा मृत्यू, २२ अजूनही बेपत्ता
15
शाळेपासून होतं प्रेम, भेटण्यासाठी गेस्ट हाऊसमध्ये बोलावलं, शरीरसंबंध ठेवले आणि अखेर तिच्यावर सपासप वार केले  
16
Viral Video : ५ वर्षांची लेक समुद्रात पडली; वाचवण्यासाठी पित्याने थेट पाण्यात उडी घेतली! पुढे काय झाले बघाच... 
17
Share Market Update: शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ४०० अंकांपेक्षा अधिक आपटला, निफ्टीही घसरला
18
अनिल अंबानींच्या कंपनीचं लोन अकाऊंट ठरणार फ्रॉड; देशातील सर्वात मोठ्या बँकेची कारवाई
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुलीलामृत पारायण सप्ताह करा; स्वामींची कायम कृपा, कालातीत अखंड लाभ
20
लोकसभा, विधानसभा झाली आतातरी निवडणूक चिन्हावर सुनावणी घ्या...; उद्धव ठाकरेंना का हवाय धनुष्यबाण...

ठोंबरे, जाधव यांना पुरस्कार

By admin | Updated: June 5, 2015 00:16 IST

शिवराज्याभिषेक दिनी वितरण : संयुक्त शिवाजी पेठेचा कार्यक्रम

कोल्हापूर : संयुक्त शिवाजी पेठेच्या वतीने गेल्या पंधरा वर्षांपासून शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या वर्षीपासून ‘शिवराज्यभूषण पुरस्कारा’चे वितरण करण्यात येणार आहे. यंदा मर्दानी खेळांचे प्रशिक्षक आनंदराव ठोंबरे व उद्योजक चंद्रकांत जाधव यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. निवृत्ती चौकातील अर्धा शिवाजी पुतळा, शिवाजी पेठ येथे शनिवारी (दि. ६) सायंकाळी सात वाजता या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र रिक्षाचालक सेना जिल्हाप्रमुख राजू जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. जाधव म्हणाले, संयुक्त शिवाजी पेठ, निवृत्ती तरुण मंडळ, निवृत्ती चौक रिक्षा मित्रमंडळ यांच्यातर्फे गेल्या पंधरा वर्षांपासून शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदापासून समाजातील विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या दोन व्यक्तींना ‘शिवराज्यभूषण’ पुरस्कार देण्यात येणार आहे. यंदा वस्ताद आनंदराव ठोंबरे व उद्योगपती चंद्रकांत जाधव यांना पुरस्कार दिला जाणार आहे. निवृत्ती चौकात दररोज सायंकाळी सात वाजता विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये हलगीवादन स्पर्धा, मराठमोळी वेशभूषा स्पर्धा, धनगरी ढोल स्पर्धा, शाहिरीचे सादरीकरण करण्यात आले होते. शिवराज्याभिषेक दिनी ६ जून रोजी सकाळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास ५१ लिटर दुधाचा विधिवत व धार्मिक पद्धतीने अभिषेक करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रसाद वाटप केला जाणार आहे. सायंकाळी सात वाजता मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. याप्रसंगी सतीश पाटील, सचिन पोवार, अमर भोसले, सयाजी घोरपडे, संजय सासने, रामभाऊ इंगवले, सुनील मगदूम, श्रीकांत चिले, राजाराम काटे, वसंत पाटील, विनायक शिंदे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)महालक्ष्मी अन्नछत्रतर्फे एक हजार किलो तांदूळरायगडावर शनिवारी (दि. ६) होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त चालवण्यात येणाऱ्या अन्नछत्रासाठी श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टतर्फे एक हजार किलो तांदूळ देण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीचे कार्याध्यक्ष फत्तेसिंग सावंत यांच्याकडे हा तांदूळ सुपूर्द केला. यावेळी अमर पाटील, गिरीष कुलकर्णी, उदय घोरपडे, प्रशांत तहसीलदार, प्रवीण पोवार, मयूर तांबे, प्रसन्न मोहिते, प्रशांत पटेल, गणेश जाधव उपस्थित होते.