शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते मूल्यांकनासाठी त्रयस्थ समिती

By admin | Updated: January 29, 2015 00:52 IST

मुंबईतील बैठकीत निर्णय : प्रकल्पाचा खर्च महिन्यात ठरणार; पुढील आठवड्यात समितीचा कोल्हापूर दौरा

कोल्हापूर : शहरातील एकात्मिक रस्ते प्रकल्पाची नेमकी किंमत ठरविण्यासाठी संतोषकुमार यांच्या नेतृत्वाखाली त्रयस्थ समिती नेमण्याचा निर्णय आज, बुधवारी मुंबईत टोलप्रश्नी पर्याय सुचविण्यासाठी नेमलेल्या समितीच्या बैठकीत घेण्यात आला. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत समितीचे अध्यक्ष व सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील दालनात दुपारी दोन वाजता ही बैठक झाली. संतोषकुमार समिती चार दिवसांत कोल्हापूरला भेट देणार असून, पुढील आठवड्यात प्रत्यक्ष कामास सुरुवात करणार आहे. यानंतर एका महिन्यात प्रकल्पाची नेमकी किंमत ठरविण्यात येईल, असे मंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.मुंबईतील बैठकीसाठी आमदार राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, महापौर तृप्ती माळवी, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपसंचालक (नगररचना) डी. एस. खोत, आदींसह समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. प्रकल्पाची नेमकी किंमत ठरविण्यासाठी तज्ज्ञांची त्रयस्थ उपसमिती नेमण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. सर्वसमावेशक अशी ही समिती असावी, असा आग्रह सर्वांनीच धरला. समितीने ठरविलेल्या किमतीबाबत शंका राहू नये, यासाठी कोल्हापूर इंजिनिअरिंग अ‍ॅँड आर्किटेक्ट असोसिएशनचा एक सदस्य, तसेच कोल्हापूर महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना या समितीमध्ये घेण्यात आले. टोल रद्द करण्यासाठीचा हा पहिला टप्पा आहे. यापूर्वी नेमलेल्या समित्यांनी फक्त दर्जा तपासला. प्रकल्पाचा नेमका खर्च पुढे आलाच नाही. प्रकल्पाचे पैसे भागविण्याचे अनेक पर्याय पुढे आहेत. ही समिती महिन्याभरात अहवाल देणार असून, यानंतर टोलचे पैसे भागविण्याबाबत चर्चा करून मार्ग काढण्यात येईल, असे मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)