नवे पारगाव : नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील जुने पारगाव मार्गावरील माणगावे कापड दुकानात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या गंठणला हिसडा मारला. महिलेने आरडाओरडा केल्यावर अर्धवट तुटलेला गंठणचा तुकडा घेऊन चोरट्याने मोटारसायकलवरून धूम ठोकली. मंगळवारी (दि. २३) घडलेल्या घटनेची फिर्याद सुमन शिवदत्त माणगावे यांनी वडगाव पोलिसांत गुरुवारी दिली आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}वडगावचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी दादासाहेब माने व अमर पावरा अधिक तपास करीत आहेत.
फोटो ओळी : नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील माणगावे यांच्या पार्वती कापड दुकानात सोन्याचे गंठण हिसडा देऊन पळून जाणारे दोघे तरुण चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत.