शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिकच्या टिमक्यांचा कडकडाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2017 00:34 IST

होळीचा जल्लोष : चमड्यांचे कारखाने बंद, बाजारात पारंपरिक टिमक्यांची संख्या घटली

 इंदूमती गणेश--कोल्हापूरहोळीला वाजविल्या जाणाऱ्या टिमक्यांच्या टिमटिमाटाची जागा आता प्लास्टिकच्या ढोल-ताशांच्या कडकडाटाने घेतली आहे. चामड्याची अनुपलब्धता, बंद झालेले चामड्याचे कारखाने आणि वाढलेल्या दराचा परिणाम म्हणून बाजारात टिमक्यांची संख्या घटली आहे. मराठी महिन्यातील शेवटचा सण म्हणून होळीला विशेष महत्त्व आहे. या दिवसापासून खऱ्या अर्थाने उन्हाळा सुरू होतो असे म्हणतात. त्यानंतर पाच दिवसांनी रंगपंचमी असते. होळीदिवशी घरोघरी पुरणाची पोळी केली जाते. संध्याकाळी दारात, गल्ली-बोळांमध्ये, कॉलन्यांमध्ये होळी पेटविली जाते. होळीदिवशी टिमकी वाजविण्याला विशेष महत्त्व आहे. होळीभोवती बोंबलू नका रे म्हणत गोल फिरताना ही टिमकी वाजविण्याची पारंपरिक पद्धत आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून या चामड्यांच्या टिमक्यांची जागा प्लास्टिकच्या ढोल आणि ताशांनी घेतली आहे.प्राण्यांचे चामडे आता मिळत नाही. तशातच आता कोल्हापुरातील कारखानेही बंद झाल्याने टिमक्यांची निर्मितीदेखील घटली आहे. काही मोजक्या कुटुंबांकडूनच टिमक्या बनविल्या जातात. त्यांचा दरही जास्त असतो. त्यामुळे व्यावसायिकांकडून प्लास्टिकच्या ढोल-ताशांची विक्री केली जाते. गुजरातहून प्लास्टिक, फायबर मागवून त्यांच्यापासून ताशा आणि ढोल बनविले जातात. टिमक्यांच्या तुलनेत ते जास्त टिकतात; त्यामुळे नागरिकांकडूनही याच ढोल-ताशांना अधिक मागणी आहे. प्रदूषणामुळे कारखाने बंद टिमक्या बनविण्याचे काम वीरशैव कक्कय्या समाजाकडून केले जाते. हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे. पूर्वी हे लोक रविवार पेठेत राहायचे. मात्र या व्यवसायामुळे सुटणाऱ्या दुर्गंधीच्या कारणास्तव त्यांना जवाहरनगर परिसरात जागा देण्यात आली. येथे चामड्याचे जवळपास ५० ते ६० कारखाने होते. ते पाण्यासह अन्य प्रदूषणाच्या कारणास्तव महापालिकेकडून बंद करण्यात आले. प्लास्टिकचे ढोल-ताशे अन्य व्यावसायिकांकडूनही विकले जात असल्याने आता या समाजाला या व्यवसायातून मिळणारे उत्पन्नही कमी झाले आहे. चामड्यापासून ढोल, टिमक्या, बॅगा अशा वस्तू बनविण्याचा आमचा पारंपरिक व्यवसाय होता. आता कारखाने बंद झाल्याने रोजगारासाठी अन्य ठिकाणी जावे लागते. होळीच्या आठ दिवसांत टिमक्यांऐवजी प्लास्टिकचे ढोल-ताशे विकून व्यवसाय चालवितो. - कल्पना कदम, व्यावसायिक