शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसनासाठी जमीन नाही

By admin | Updated: November 17, 2014 00:36 IST

बोरपाडळे ग्रामस्थ : आज धरणग्रस्त जमिनीचा ताबा घेणार

देवाळे : बोरपाडळे (ता. पन्हाळा) येथील गायरान गट क्र.३३७ मधील साडेसात एकर जमीन चांदोली धरणग्रस्तांना दिली आहे. ती त्यांना कोणत्याही परिस्थितीत देऊ देणार नाही, असा इशारा ग्रामपंचायत व ग्रामस्थ बोरपाडळे यांनी अर्जाद्वारे दिला आहे. उद्या, सोमवारी पोलीस बंदोबस्तात धरणग्रस्त या जमिनीचा ताबा घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर बोरपाडळे ग्रामस्थांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, सर्व ग्रामस्थ व कब्जाला जनआंदोलनाद्वारे कडक विरोध करणार आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की, बोरपाडळे येथील बोरपाडळे-कोडोली रस्त्याला लागून असलेली गायरानमधील (गट क्र. ३३७) साडेसात एकर जमीन १९९८ साली कुल्याचीवाडी (ता. शाहूवाडी) येथील चांदोली अभयारण्याग्रस्तांसाठी वाटप करण्यात आली. एकूण ३८ कुटुंबे याठिकाणी सुमारे दोन महिने राहिली. पाण्याची सुविधा, डोंगराळ जागा व इतर सुविधा नसल्याने या लाभार्थ्यांनी ही जागा नाकारली. त्यांचे अन्यत्र पुनर्वसन करण्यात आले. यासंदर्भात ग्रामपंचायतीमार्फत संबंधित जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्याबरोबर बोलणी सुरू आहे. त्यासाठी उपजिल्हा पुनर्वसन अधिकारी यांनी १९ नोव्हेंबरला सुनावणी ठेवली आहे. परिस्थिती नाजूक बनलेली आहे. या ठिकाणी अनुचित प्रकार घडल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात यावे, असा इशाराही देण्यात आला आहे. (वार्ताहर)१९९८ ते आॅगस्ट २०१४ पर्यंत याच ३८ लाभार्थ्यांच्या नावावर सातबारा असणारी हीच जमीन सप्टेंबर २०१४ मध्ये पाच चांदोली धरणग्रस्तांच्या नावावर झाली. ही सर्व प्रक्रिया बेकायदेशीर व घाईगडबडीत केली असून, ग्रामपंचायत व ग्रामस्थांना या प्रक्रियेत विचारात घ्यायला हवे होते, असे ग्रामपंचायतीचे सदस्य व ग्रामस्थ यांनी म्हंटले आहे.