शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

कामकाजावर आता बहिष्कार नाही

By admin | Updated: December 3, 2015 01:15 IST

सर्किट बेंच प्रश्न : बार असोसिएशनच्या बैठकीत निर्णय; उच्च न्यायालयास ९ डिसेंबरला हमीपत्र

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे ‘सर्किट बेंच’ कोल्हापुरात मंजूर करण्यासाठी वकिलांनी येथून पुढे न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहू नये, तसेच बहिष्कारही टाकू नये, असा ठराव जिल्हा बार असोसिएशनच्या बैठकीत बुधवारी करण्यात आला. या ठरावाचे हमीपत्र ९ डिसेंबरच्या सुनावणीवेळी उच्च न्यायालयास सादर केले जाणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र चव्हाण यांनी दिली. गेली ३० वर्षे सहा जिल्ह्यांतील वकील संघटना मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन होण्यासाठी लढत आहेत. तत्कालीन न्यायमूर्ती मोहित शहा यांनी याबाबतीत निर्णय न घेता निवृत्ती घेतल्याने संतप्त वकिलांनी जिल्हा न्यायालयाच्या आवारात त्यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून त्यांच्या पुतळ्याचे दहन केले होते. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी खंडपीठ कृती समितीला नोटीस बजावली होती, तसेच बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र आणि गोवा यांना कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सोलापूर या सहा जिल्ह्यांतील बार असोसिएशनची मान्यता रद्द करण्याचे आदेश दिले होते. दि. २६ आॅक्टोबरला मुंबई उच्च न्यायालयात हजर राहून याबाबत म्हणणे जोपर्यंत मांडत नाही, तोपर्यंत न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार घालणार नाही, अशा हमीचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या; परंतु आंदोलनाबाबत म्हणणे व ‘काम बंद’च्या निर्णयाचे हमीपत्र न्यायालयास सादर न करण्याचा निर्णय घेत आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा निर्णय खंडपीठ कृती समितीने घेतला होता. त्यावर न्यायमूर्ती ओक यांनी ठराव केलेल्या वकिलांची नावे तसेच सूचक, अनुमोदक यांच्या नावांसह प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. हमीपत्र सादर करण्यासाठी २ डिसेंबरला कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन व ५ डिसेंबरला खंडपीठ कृती समितीची बैठक घेऊन दोन्ही बैठकांतील निर्णय घेऊन हमीपत्र ९ डिसेंबरच्या सुनावणीदरम्यान सादर करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. त्यानुसार कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या हॉलमध्ये बुधवारी दुपारी पदाधिकारी व सदस्यांची बैठक झाली. यावेळी न्यायालयाच्या आदेशानुसार सर्किट बेंचप्रश्नी आंदोलनाबाबत म्हणणे व न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार घालणार नाही, अशा हमीचे प्रतिज्ञापत्र न्यायालयास सादर करावे, या निर्णयावर सर्वांनुमते मंजुरी घेण्यात आली. तसेच सर्किट बेंचप्रश्नी उच्च न्यायालयास पुढे काही म्हणणे द्यायचे असेल तर जिल्हा बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा. त्यासाठी सर्व वकिलांची बैठक घेण्याची आवश्यकता नाही, असा सूरही बैठकीत उमटला. त्यानुसार या निर्णयाचा ठराव करून त्याला सूचक विवेक घाटगे झाले व माणिक मुळीक यांनी अनुमोदन दिले. हमीपत्र ९ डिसेंबरच्या सुनावणीदरम्यान न्यायालयास सादर केले जाणार असल्याचे अ‍ॅड. चव्हाण यांनी सांगितले. बैठकीस अ‍ॅड. प्रशांत चिटणीस, विवेक घाटगे, आदींसह वकील उपस्थित होते. (प्रतिनिधी)