शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

गतवैभव देण्याचे आव्हान कायम

By admin | Updated: August 4, 2015 23:55 IST

गडहिंग्लज बाजार समिती : सत्ताधाऱ्यांवर ‘जबाबदारी’, विरोधकांनाही ‘बळ’

राम मगदूम-गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सभासदांनी सत्ताधाऱ्यांवरच पुन्हा टाकलेला विश्वास आणि विरोधकांना दिलेली लक्षणीय मते दोन्ही ‘दखलपात्र’ आहेत. निकालावरून सत्ताधाऱ्यांची जबाबदारी आणि विरोधकांचे ‘बळ’ वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.आर्थिक अडचणीतील बाजार समितीवर निवडणूक खर्चाचा भुर्दंड नको आणि सर्वांच्या सहकार्यातून समितीचा ‘बाजार’ सावरावा या उद्देशानेच गतवेळीदेखील निवडणूक ‘बिनविरोध’चा प्रयत्न झाला. मात्र, ‘कागल’च्या तत्कालीन राजकारणाचा फटका ‘गडहिंग्लज’लाही बसल्याने निवडणूक झाली. सर्वपक्षीय सत्ताधाऱ्यांनी ‘लढून’ एकतर्फी सत्ता मिळविली. परंतु, त्यांच्याच ‘सभापती’नी नेत्यांचे स्वप्न अन् ‘गडहिंग्लज’ची प्रतिष्ठा धुळीला मिळविली.याच पार्श्वभूमीवर यावेळची निवडणूकदेखील गाजण्याची आणि वाजण्याची शक्यता होती. त्याप्रमाणे ती नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांनी ‘गाजली’ आणि सभासदांनी त्यांना ‘वाजवले’ही. तथाकथित भूखंड घोटाळ्याभोवतीच या निवडणुकीचा प्रचार-अपप्रचार केंद्रित राहिला. मात्र, बेकायदा भूखंड वाटप रद्द केल्याचा मुद्दा ठासून सांगितल्यामुळेच त्यातून सत्ताधाऱ्यांची ‘सुटका’ झाली.चंदगडचे तिन्ही पाटील, ‘गडहिंग्लज’च्या संध्यादेवी कुपेकर, श्रीपतराव शिंदे व सदानंद हत्तरकी, आजऱ्याचे जयवंतराव शिंपी, मुकुंद देसाई व रवींद्र आपटेंसह ‘कागल’च्या मुश्रीफ-मंडलिक व विक्रमसिंहराजेंच्या गटाची मोट बांधण्यात प्रकाश चव्हाण आणि अशोक चराटींना यश आले. एकीची मोट व एकसंघ आघाडीमुळेच त्यांची सत्ता अबाधित राहिली.विरोधी शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मित्रपक्षांना व गटांना एकत्र आणून सत्ताधाऱ्यांना आव्हान दिले. कृषी प्रक्रिया गटातील अपक्ष उमेदवार श्रीरंग चौगुले यांच्यासह विरोधी आघाडीला यशाचा पल्ला लांब राहिला, तरी त्यांनी घेतलेली मते लक्षणीय आणि विरोधी राजकारणाला बळ देणारी आहेत. किंबहुना, हाच या निवडणुकीच्या निकालाचा बोध आहे.हे करायले हवेनवनिर्वाचित संचालक मंडळात भाजपचा प्रतिनिधी असल्यामुळे सहकार व पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून सहकार्य व मदत मिळविणे सोपे झाले आहे. त्यांची साथ मिळाल्यास गतवैभव मिळवून देणे अवघड नाही.सीमाभागातील नावाजलेली मार्केट कमिटी म्हणून गडहिंग्लजची ओळख होती. मात्र, शेतीमालाची आवक घटल्याने गडहिंग्लजच्या मार्केट यार्डाला अवकळा आली आहे. याठिकाणी कृषिपूरक व्यवसाय वाढण्यासाठी शेतकरी व व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. शेतकरी भवनासह जनावरांच्या बाजारातही मूलभूत सुविधा द्यायला हव्यात.गडहिंग्लज शहरातील भाजीपाल्याचा सौदा मार्केट यार्डात हलविण्याबरोबरच अधिकाधिक शेतीमालाची आवक वाढविणे आणि ‘सेस’ची काटेकोर वसुली करून उत्पन्न वाढविण्याबरोबरच आर्थिक स्वंयपूर्णतेसाठी उत्पन्नाचे नवे मार्ग शोधण्याची गरज आहे.गडहिंग्लज व तुर्केवाडी या ठिकाणी गोदामे व कोल्डस्टोरेज बांधण्याबरोबरच मुरगूड व अडकूर येथील बाजार वाढीलादेखील प्रोत्साहन देण्याची गरज आहे.