शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
4
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
5
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
6
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
7
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
8
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
9
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
10
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
11
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
12
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
13
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
14
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
15
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
16
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
17
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
19
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
20
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख

...तर जिल्ह्यातील ‘संग्राम कक्षा’स टाळे

By admin | Updated: November 25, 2014 00:31 IST

परिचालक संघटनेचा मोर्चाने इशारा : पदाधिकाऱ्यांना पूर्ववत कामावर घ्यावे

कोल्हापूर : विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी संगणक परिचालक (डाटा आॅपरेटर्स)यांचे आंदोलन महाराष्ट्र राज्य सुरू आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांना महाआॅनलाईन कंपनीने कामावरून कमी केले आहे. महाआॅनलाईन कंपनीने आठ दिवसांच्या आत जिल्ह्णातील व राज्यातील कामावरून कमी केलेल्यांना पूर्ववत कामावर घ्यावे, अन्यथा जिल्ह्णातील सर्व पंचायत समितीमधील संग्राम कक्षांना टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून देण्यात आला. जोरदार निदर्शने केली. महावीर गार्डनपासून संघटनेचे अध्यक्ष विशाल चिखलीकर, राज्य तांत्रिक सल्लागार दीपक पोवार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात झाले. जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा केला तेथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) एम. एस. घुले यांना देण्यात आले. तेथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा येऊन धडकला. निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे, डाटा आॅपरेटर्सना शासकीय सेवेत घ्यावे, मासिक वेतन १० हजार करावे आदी मागण्यांसाठी १२ नोव्हेंबरपासून डाटा आॅपरेटर्स ‘काम बंद’ आंदोलन करत आहेत. आंदोलनाची दखल शासकीय पातळीवर घेतली आहे. १८ नोव्हेंबरला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबतच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. एक समिती नेमून कोणत्याही डाटा आॅपरेटर्सवर अन्याय होणार नाही, असा स्वरुपाचे आश्वासन दिले आहे. बैठकीच्यावेळीच मागण्यांसंबंधी योग्य निर्णय होत नाही तोपर्यंत संग्राम कक्षातील कामावर ‘डाटा आॅपरेटर्स’चा बहिष्कार कायम राहील, असे संघटनेच्या राज्याध्यक्षांनी सांगितले आहे, अशा घडामोडी सुरू असताना कंपनीने पदाधिकाऱ्यांनी कमी केले आहे. हे पूर्णपणे चुकीचे आहे. जिल्हा आणि तालुका पदाधिकारी यांना कामावरून कमी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे कंपनीने कामावरून कमी करण्याची कारवाई त्वरित मागे घ्यावी. मोर्चात जिल्हा संघटक उमेश कांबळे, जिल्हा अध्यक्ष सुनील देवेकर, उपाध्यक्ष प्रकाश कांबळे यांच्यासह पदाधिकारी, जिल्ह्णातील डाटा आॅपरेटर्स सहभागी झाले होते.