शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

महिलेला बेशुद्ध करून जबरी चोरी

By admin | Updated: November 26, 2014 00:23 IST

गडहिंग्लज येथील घटना : दागिने आणि रोख रकमेसह ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास

गडहिंग्लज : येथील शशिकला दयानंद वाडेकर (वय २९, रा. नेवडे गल्ली, शिवाजी चौक, गडहिंग्लज) या विधवा महिलेला उठवून बेशुद्ध करीत अंगावरील, तसेच कपाटातील दागिन्यांसह ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. सोमवारी रात्री अडीचच्या दरम्यान घडलेली ही घटना आज, मंगळवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.शशिकला हिच्या पतीचे आठ वर्षांपूर्वी निधन झाले असून, ती आपला मुलगा आदित्य (९) सह नेवडे गल्लीतील आपल्या घरात राहते. रात्री अडीचच्या सुमारास दरवाजावर कुणीतरी थाप मारली. त्यावेळी आपला भाऊ आल्याचे समजून शशिकला हिने दार उघडताच बाहेरील दोन काळे कपडे परिधान केलेल्या व तोंडाला काळे रुमाल बांधलेल्या अज्ञातांनी शशिकला हिला रुमालातून उग्र वास दिला. तेव्हा ती बेशुद्धझाली.चोरट्यांनी तिच्या गळ्यातील चेन, कानातील रिंगा, तसेच आदित्यच्या गळ्यातील लॉकेट आणि तिजोरीतील नेकलेस, चेन, टॉप्ससह रोख ११ हजार, असा एकूण सुमारे ७६ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. सकाळी सहा वाजता आदित्य उठल्यानंतर त्याला शशिकला दरवाजाजवळ हात-पाय बांधलेल्या अवस्थेत बेशुद्ध दिसली. आदित्यने शेजाऱ्यांसह शशिकलाचे शेजारीच राहणारे दीर शिवानंद वाडेकर यांना बोलाविले. त्यानंतर उपचार झाल्यानंतर शशिकला शुद्धीत आल्या आणि नेमकी घटना उघडकीस आली. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सागर पाटील, प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश सोनवणे, उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे, आदींनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. (प्रतिनिधी)हात-पाय बांधून लुटमाररात्री अडीचच्या सुमारास कुणीतरी दारावर थाप मारली असता बाहेर कोण आहे, याची खात्री न करता शशिकलाने दार कसे उघडले ? दार उघडण्यापूर्वी घरातील झिरो बल्ब सोडून मोठा बल्ब का नाही लावला? असे प्रश्न घटनास्थळी लोकांकडून उपस्थित केले जात होते.घटनास्थळावर मुख्यालयातून श्वानपथकाला, तसेच ठसेतज्ज्ञांना पाचारण केले. श्वानाने नेवडे गल्लीतून महालक्ष्मी मंदिराजवळून मुख्य रस्त्यापर्यंतचा माग काढला.