शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

कोल्हापूर: मसाई पठारावर रानफुलांची मुक्त उधळण, पर्यटकांची होवू लागली गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2022 14:11 IST

तीन महिने पहावयास मिळतो रानफुलांचा हंगाम

नितीन भगवानपन्हाळा : ऐतिहासिक पन्हाळा गडाच्या पश्चिमेस असलेल्या विस्तीर्ण अशा मसाई पठारावर रंगीबेरंगी रानफुलांची मुक्त उधळण सुरु झाली. निसर्ग निर्मीत सप्तरंगाचा हा उत्सव पाहण्यासाठी पर्यटक व अभ्यासकांची पठारावर गर्दी होवू लागली आहे.   महाराष्ट्रातील सर्वात मोठे पण दुर्लक्षीत असलेले मसाई पठार सुमारे १००० एकर सलग आहे. या पठाराचे नऊ विभाग आहेत. या प्रत्येक विभागाला स्थानिक निरनीराळी नावे असुन प्रत्येक विभागातील दरीमध्ये पाणी, झाडे व प्राचीन गुहा आहेत. यापैकी पांडव दरामध्ये असलेली प्राचीन लेणी ही पहाण्या सारखी असुन हा एक संशोधनाचा विषय आहे. तर पठारावर पौराणिक असा ईश्वर म्हादु तलाव असून या परीसरात दुर्मीळ असा गिधाड पक्षी पहावयास मिळतो.  पठारावर सप्तरंगी फुलांबरोबरच विविध फुलपाखरे, पक्षी, सरपटणारे प्राणी, ससा आणि गेळा या प्राण्यांच्या चार वेगवेगळ्या जाती पहावयास मिळतात. पठारावरील जांभ्या दगडात दगडी फुलांसारखी दिसणारी दुर्मीळ बुरशी जी माणसाच्या त्वचा विकारावर अत्यंत गुणकारी ठरलेली यावर हाफकिन इन्स्टिट्युट या नामांकित संस्थेने संशोधन करुन सर्वमान्य केलेली अशी बुरशी पहावयास मिळते.   विविधरंगी फुलासह, औषधी वनस्पतीरानफुलांचा हंगाम सुरु असून विविध नैसर्गिक फुले निसर्गप्रेमींचे लक्ष वेधुन घेत आहेत. विस्तीर्ण अशा हिरव्या गवताच्या गालीच्यावर फुललेली सफेद मुसळी (क्लोरोफायटम), सोनकी(सेनीसीओ), केना (कॕमेलोना), कापरु (बिओनीआ), मंजीरी (पोगोस्टीमोन डेक्कननेन्सीन), निलवंती( सायनोटीस), सितेची आसव (युट्रीक्युलेरीया), सफेद गोंद (इरिओकोलास), निलीमा (ॲनीलीमा), कंदीलफुल (सिरोपोनीया), दिपकाडी (डिपकॕडी), याशिवाय रान कोथींबीर, रानहळद, जंगली सुरण, तेरडा या औषधी वनस्पती पहावयास मिळतात.   मसाई पठारवर वर जाताना अग्निशीखा अर्थात कळलावीची फुले व शतावरीचे वेल, भारंगी या औषधी वेली, झुडपे पहावयास मिळतात पठारावर एकाच जातीच्या पण यात विविध प्रकार असलेल्या फुलांपैकी स्मीथीया म्हणजे पिवळी फुले याच्या पठारावर उगवणाऱ्या  नऊ जाती आहेत. या सर्वच जाती मसाई पठारावर ऊगवतात यातील सर्वात मोठे फुल ऊगवणाऱ्या  वनस्पतीवरील पिवळ्या फुलावरील पाकळीवर दोन लहान तांबडे ठिपके असतात यालाच मिकीमाऊसची फुले असे म्हणले जाते. समुहाने वाढणारी ही फुले या ठिकाणच्या पाणथळ परीसरात आहेत यात प्रामुख्याने सफेदमुसळी, निळीचीराइत, भुईआमरी (ग्राउंडआर्केड) काळीमुसळी (कुरकीलॕगो), सफेदगेंद ही तर चेंडुच्या आकाराची लहान फुले निसर्गप्रेमींचे लक्षवेधुनच घेतात याच्या पण दहा जाती आहेत यातील पठारावर गोलगेंद, तारागेंद, पानगेंद या जाती प्रामुख्याने दिसतात.   ॲडव्हेंचर पार्क वेधून घेतोय पर्यटकांचे लक्षकोल्हापूर पासून ३५ कि.मी.वर असणारे मसाई पठार त्याच्या पायथ्थाशी असणाऱ्या ॲडव्हेंचर पार्क पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. जैवविविधतेने नटलेल्या या ऐतिहासिक, पौराणिक व खगोल अभ्यासकांचे हक्काचे ठिकाण असलेल्या महती बरोबरच नैसर्गिक फुलांमुळे वेगळी ओळख निर्माण होवू लागली आहे.   पावसाळ्यानंतर तीन महिने पहावयास मिळतो हंगामनिसर्ग मित्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. मधुकर बाचुळकर आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले की, उत्तर पश्चिम घाटातील बहुतेक पठारावर नैसर्गिक पावसाळ्यानंतर रानफुलांचा हंगाम तीन महिने पहावयास मिळतो. पण मसाई पठारावरील बेसॉल्ट लॕट्राईट खडक हा पाऊस, वारा यांच्या मुळे झिज होवून त्यावर हलक्या प्रमाणात मातीचा थर निर्माण होतो. अन् यावर नैसर्गिक फुलांची बाग तयार होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरtourismपर्यटन