शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे; ५ जुलैला होणारा ठाकरे बंधुंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

वस्त्रोद्योग कामगार प्रश्नी राज्यव्यापी आंदोलन : नाईक

By admin | Updated: November 17, 2014 00:23 IST

हिवाळी अधिवेशनावर निदर्शने करण्याचा निर्णय

इचलकरंजी : केंद्र व राज्य सरकारने कामगार कायद्यामध्ये बदल घडवून कामगारांचे हित बाजूला ठेवण्याचा घाट घातला आहे. तरी कामगारांवर अन्याय होईल, असे कायदे नव्याने तयार करू नयेत. त्याचबरोबर राज्यातील वस्त्रोद्योगामध्ये असलेल्या कामगारांच्या समस्या समजावून घेऊन शासनाने त्या सोडवाव्यात, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र मोफिसील टेक्स्टाईल्स अँड अलाईट इंडस्ट्रिज वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष हरिभाऊ नाईक यांनी दिला.येथील औद्योगिक वसाहतीमध्ये वर्कर्स फेडरेशनची राज्यव्यापी बैठक झाली. या बैठकीच्या प्रमुख भाषणात नाईक बोलत होते, तर बैठकीच्या अध्यक्षस्थानी मध्य प्रदेश इंटकचे श्यामसुंदर यादव होते. या बैठकीच्या सुरूवातीला माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी दीपप्रज्वलन केले. आपल्या प्रमुख भाषणात नाईक यांनी, राज्य शासनाने जाहीर केलेल्या वस्त्रोद्योगाविषयीच्या समितीवर कामगार व मालकांचे प्रतिनिधी घ्यावेत, अशी मागणी केली.टेक्स्टाईल्स वर्कर्स फेडरेशनचे उपाध्यक्ष शामराव कुलकर्णी म्हणाले, वस्त्रोद्योगातील स्पिनिंग व प्रोसेसिंग या व्यवसायातील कामगारांच्या वेतनाची पुनर्रचना झाली पाहिजे. यंत्रमाग उद्योगामध्ये असलेल्या सुमारे साडेचार लाख कामगारांसाठी कामगार कल्याण मंडळाची स्थापना शासनाने करावी. तसेच वस्त्रोद्योगातील कामगारांना घरकुले बांधून द्यावीत.अध्यक्षीय भाषणात यादव म्हणाले, केंद्र सरकारचे नवे कामगार धोरण ठरविताना कामगार प्रतिनिधींना विश्वासात घेतले पाहिजे. त्याचबरोबर कामगार कायद्यामध्ये करण्यात येणाऱ्या दुरूस्त्या कामगार वर्गावर अन्याय करणाऱ्या नसतील, याची दक्षता घ्यावी. बैठकीमध्ये सोलापूरचे चंद्रकांत सुरवसे, वर्कर्स फेडरेशनचे कार्यकारी अध्यक्ष विठ्ठलराव कदम, धुळ्याचे साहेबराव यड्रावकर, आदींची भाषणे झाली. फेडरेशनचे खजिनदार सुदाम शिंगणे यांनी अहवाल वाचन केले. बैठकीसाठी औरंगाबाद, नांदेड, आचलपूर, नागपूर, अमरावती, पुलगाव, सोलापूर, धुळे, आदी ठिकाणचे प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)हिवाळी अधिवेशनावर निदर्शने करण्याचा निर्णयमहाराष्ट्राच्या हिवाळी विधानसभा अधिवेशनावेळी नागपूर येथे फेडरेशनची बैठक घेऊन त्यामध्ये वस्त्रोद्योग व्यवसायातील कामगारांच्या प्रश्नांबाबत उहापोह करण्यात येणार आहे. तसेच अधिवेशनावर मोर्चाने जाऊन निदर्शने करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.