शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

दहावी पास, पण मार्क नाही कळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:20 IST

कोल्हापूर: एसएससी बोर्डाची (राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ) वेबसाईटच क्रॅश झाल्याने दहावीचा निकाल शुक्रवारी ऑनलाइन लागला पण ...

कोल्हापूर: एसएससी बोर्डाची (राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ) वेबसाईटच क्रॅश झाल्याने दहावीचा निकाल शुक्रवारी ऑनलाइन लागला पण दुपारपर्यंतही तो पाहता आला नाही. त्यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षकांचा जीव टांगणीला लागला. घराघरात प्रत्येक जण मोबाइलवर वेबसाईट सुरू होण्याची प्रतीक्षा पाहत असल्याचे चित्र होते. कॅफेमध्येदेखील विद्यार्थ्यांनी गर्दी केली, पण तेथेही पदरी निराशाच आली. त्यामुळे पास झालो पण मार्क नाही कळले अशीच परिस्थिती सर्वांची होती.

दहावीचा निकाल गेल्या चार-पाच वर्षांपासून ऑनलाइनच लागत असल्याने निकालाविषयी प्रचंड हुरहूर असते. पण यावर्षी कोरोनामुळे परीक्षाच न झाल्याने जेवढ्यांनी म्हणून नोंदणी केली ते सर्व विद्यार्थी दहावी पास होणार असल्याने पास-नापासची उत्सुकताच नव्हती. होती ती फक्त किती मार्क मिळाले याचीच. त्यामुळे दुपारी १ वाजता मार्क पाहायला मिळणार म्हणून १२ वाजल्यापासून मोबाइलवर निकालाची लिंक सर्च करण्यात सर्वच जण व्यस्त होते. प्रत्यक्षात १ वाजता निकाल जाहीर झाल्यानंतर बोर्डाकडून दिलेल्या वेबसाईटपैकी एकही लिंक खुली होत नव्हती. प्रत्येक जण एकमेकांकडे विचारपूस करत होता, पण दुपारचे चार वाजून गेले तरी देखील लिंक खुली झाली नाही.

सर्वच जण पास झाल्याचा जल्लाेष सुरू असताना किती मार्क मिळाले असतील याची हुरहूर प्रत्येक विद्यार्थी व पालकांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती. दहावीचे हे मार्क पुढील प्रवेशासाठी किती गृहीत धरणार हे पुढील शासन धोरणावर अवलंबून असले तरी किमान सीईटीसाठी पात्र ठरतील या अपेक्षेनेच निकालाची उत्सुकता होती.

चौकट

बैठक क्रमांक शोधण्याची सोय

बैठक क्रमांक विसरला असल्यास तो कळावा यासाठी बोर्डाने यावर्षी वेबसाईटवर विशेष सेवा दिली होती. त्यात संबंधित विद्यार्थ्याची जन्मतारीख, आईचे नाव याचा कॉलम भरल्यानंतर बैठक क्रमांक उपलब्ध करून दिला जात होता. नंतर हा बैठक क्रमांक घेऊन मगच वेबसाईटवर टाकून निकाल पाहता येणार होता, पण प्रत्यक्षात एकही लिंक ओपन होत नसल्याने निकाल पाहता आला नाही.

फोटो: १६०७२०२१-कोल-निकाल ०१

फोटो ओळ: कोल्हापुरात शुक्रवारी दहावीचा निकाल ऑनलाइन जाहीर झाला पण वेबसाईटचा ओपन होत नसल्याने विद्यार्थी, पालकांचा जीव कासावीस होत होता, निवृत्ती चौकातील इंटरनेट कॅफेमध्ये अशी गर्दी जमली होती. (छाया: नसीर अत्तार)

फोटो: १६०७२०२१-कोल-निकाल ०२

फोटो ओळ: कोल्हापुरात शुक्रवारी ऑनलाइन निकाल जाहीर झाला खरा, पण वेबसाईट ओपन होत नसल्याने मंगळवार पेठेत परिसरातील विद्यार्थी असे दिवसभर मोबाइलला खिळून होते. (छाया: नसीर अत्तार)