शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

सभापतींची बंडखोरी की तात्पुरती सोयरीक?

By admin | Updated: December 30, 2015 00:29 IST

कागलचे राजकारण : नवी समीकरणे पुढे येणार काय याची उत्सुकता

जहाँगीर शेख --कागल -विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कागल पंचायत समितीचे सभापती श्रीकांत उर्फ पिंटू लोहार यांनी आपल्या गटाचा आदेश डावलून सतेज उर्फ बंटी पाटील यांची बाजू उघडपणे घेतल्याने अनेकांच्या राजकीय भूवया उंचावल्या असून, तालुक्यात याची जोरदार चर्चा सुरू होती. सभापतीची ही बंडखोरी पंचायत समितीच्या राजकारणास उलथापालथ घडविणार की तात्पुरती राजकीय सोयरीक ठरणार, याचीच चर्चा आज रंगली होती.सध्या पंचायत समितीवर माजी आमदार संजय घाटगे आणि प्रा. संजय मंडलिक गटाची सत्ता आहे. चार वर्षांपूर्वी घाटगे-मंडलिक गट एकत्रित लढून त्यांनी राजे मुश्रीफ-पाटील गटावर मात करीत ही सत्ता मिळविली आहे. संजय घाटगे गटाचे चार तर मंडलिक गटाचे तीन सदस्य आहेत, तर मुश्रीफ गटाचे दोन, राजे गटाचा एक असे विरोधी बाकावर आहे. विद्यमान सभापती पिंटू लोहार घाटगे गटाचे, तर उपसभापती भूषण पाटील मंडलिक गटाचे आहेत. मात्र हे दोन्ही पदाधिकारी तयारीचे असल्याने पदावरचे सर्व हक्क अधिकार पुरेपूर उपयोगात आणतात. फार दबाव घेत नाहीत. यातून येथे सत्ताधारी गटातच शह काटशह सुरु असतो, मात्र हे चव्हाट्यावर येत नाही. आता विधानपरिषद निवडणुकीत सभापतींनी सुरुवातीपासून गटाच्या विरुद्ध भूमिका घेतली. इचलकरंजीचे नगरसेवक संजय तेलनाडे यांनी आणलेल्या अर्जावर बेधडक सूचक म्हणून सही केली. तर संजय घाटगेंनी आ. महाडिक यांना पाठिंबा दिला असता. ते सतेज पाटील यांच्या बाजूला राहिले आणि समरजितसिंह राजे आणि आमदार मुश्रीफ एकत्रच होते. तालुक्यातील मतदारही त्यांना एकत्र सहलीवर पाठविले. या घडामोडीतून पंचायत समितीच्या राजकारणात काही नवीन समीकरणे पुढे येणार काय, याची उत्सुकता तालुक्याच्या राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे.बंडाकडे दुर्लक्ष करण्याशिवाय गत्यंतर नाहीवर्षावर येऊन ठेपलेली पंचायत समितीची निवडणूक. त्यापूर्वी कागल -मुरगूड नगरपालिकांच्या निवडणुका यांचा विचार करता प्रा. संजय मंडलिक आणि समरजितसिंह घाटगे, आमदार मुश्रीफ आणि संजय घाटगे यांच्याशी फार जवळीक आणि टोकाचा विरोध अशी कोणतीच भूमिका तूर्ततरी घेणार नाहीत, अशीच चिन्हे दिसत असल्याने सभापतींचे हे बंड तात्पुरती राजकीय सोयरीक ठरण्याची शक्यता आहे. तर संजय घाटगेंनाही या बंडाकडे दुर्लक्ष करण्याशिवाय गत्यंतर नाही, अशी ही परिस्थिती आहे.