शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला शिक्षकांचे पाठबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 00:39 IST

समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राज्यात सर्वाधिक विद्यार्थी ...

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राज्यात सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आणत कोल्हापूर जिल्ह्याने आपला या क्षेत्रातील दबदबा कायम असल्याचे स्पष्ट केले आहे. जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिकांच्या शिक्षकांनी जे परिश्रम घेतले आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला आकार दिला, त्या सर्वांचेच हे यश आहे, असे म्हटले पाहिजे.कोल्हापूर जिल्ह्याने आशियासह आफ्रिका खंडाच्या प्राथमिक शिक्षणाला दिशा देण्याची कामगिरी केली, पद्मविभूषण डॉ. जे. पी. नाईक यांच्या या जिल्ह्याने मिळविलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे. गेली काही वर्षे शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये कोल्हापूरने वेगळी ओळख निर्माण केली आहे. झोकून देणाऱ्या शिक्षकांची जिल्ह्यात कमतरता नाही. अगदी रविवारची सुट्टी न घेताही काम करणारे अनेक शिक्षक आणि शिक्षिका आहेत. दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्टीतही अध्यापनाचे काम करणारे शिक्षक आहेत. या शिक्षकांना नोकरीच्या ठिकाणी ग्रामस्थांचा चांगला पाठिंबा आहे.शिष्यवृत्ती परीक्षेतील हे दरवर्षी मिळणारे राज्यव्यापी यश सहजासहजी मिळालेले नाही. त्यासाठी अनेकांनी आपले घरदार सोडून विद्यार्थ्यांकडून अभ्यास करवून घेतला असल्याने ते शक्य झाले आहे. ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार मिळणार किंवा नाही याचा विचार न करता हे काम करणारी अनेक मंडळी कोल्हापूर जिल्ह्यात आहेत. म्हणूनच हे यश पाहायला मिळत आहे.शिक्षकांच्या पाठीशी राहणे गरजेचेजिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिकांच्या पदाधिकाऱ्यांनी यापुढील काळात शिक्षकांच्या पाठीशी राहण्याची भूमिका घेतली पाहिजे.काही शिक्षक हे जरी नेतेगिरी करीत असले, चुकारपणा करीत असले, बेकायदेशीर कामांमध्ये अडकले असले तरी त्याच दृष्टीने अन्य शिक्षकांकडे पाहून उपयोग नाही.शिक्षकांच्या बदल्या म्हणजे ‘मिळकतीची आयती संधी’ असे पाहू नये. त्यांना पुरस्कारासाठी जोडणी करावी लागू नये एवढी जरी दक्षता घेतली तरी खूप काही केल्यासारखे होईल.कोल्हापूर शहर आणिजिल्ह्याचा एकूण निकाल (शिष्यवृत्तीधारक)अ. न. तालुका पाचवी आठवी एकूण१ भुदरगड ८५ ७१ १५६२ राधानगरी ६९ ८१ १५०३ कागल ७९ ४४ १२३४ गडहिंग्लज ४६ ४० ८६५ करवीर ३६ ४५ ८१६ आजरा ३५ ४३ ७८७ चंदगड २७ ३६ ६३८ शिरोळ २८ २७ ५५९ हातकणगंले १९ २६ ४५१० पन्हाळा ५ २८ ३३११ शाहूवाडी ७ १४ २११२ गगनबावडा २ ४ ६एकूण ४३८ ४५९ ८९७कोल्हापूर म.न.पा १०३ ६७ १७०इचलकरंजी न. पा ५० ५५ १०५एकूण १५३ १२२ २७५एकू ण ५९१ ५८१ ११७२