शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचा शासनाच्या नावानं ‘गोंधळ’

By admin | Updated: June 9, 2016 01:23 IST

अनुदान मागणीसाठी आंदोलन : शासकीय आदेश निघेपर्यंत लढा सुरूच ठेवणार : जगदाळे

कोल्हापूर : अनुदानपात्र शाळा, वर्गतुकड्यांना अनुदान द्यावे, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी शिक्षकांनी राज्य शासनाच्या, मुख्यमंत्र्यांच्या, शिक्षण, अर्थमंत्र्यांच्या नावानं चांगभलं,’ असे म्हणत प्रतीकात्मक गोंधळ घालून अभिनव आंदोलन केले. उपोषणकर्त्यांची प्रकृती स्थिर आहे. मागणी मान्यतेचा शासकीय आदेश निघेपर्यंत आंदोलनाद्वारे लढा सुरूच ठेवणार असल्याचे कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी सांगितले.अनुदानपात्र ठरलेल्या शाळा व वर्ग तुकड्यांना त्वरित वेतन व अनुदान शासनाकडून मिळावे, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समिती आणि राज्यमान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या नेतृत्वाखाली शिक्षकांचे शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या प्रवेशद्वारात आमरण उपोषण सुरू आहे. आंदोलनाच्या आठव्या दिवशी बुधवारी शिक्षकांनी शासनाच्या नावानं देवीची प्रतीकात्मक पूजा मांडून गोंधळ घातला. त्याची सुरुवात त्यांनी दुपारी साडेबाराच्या सुमारास केली. आंदोलनकर्त्या काही शिक्षकांनी गोंधळी व त्यांच्या सहकाऱ्यांसारखा पेहराव करून, संबळ वाजवून गोंधळ घातला. दीड तासाहून अधिक वेळ त्यांचे हे आंदोलन सुरू होते. यात खंडेराव जगदाळे, रामचंद्र कदम, गजानन काटकर, राजू भोरे, महासंघाचे राज्य उपाध्यक्ष संतोष आयरे, राजेंद्र कोरे, मुख्याध्यापक संघाचे एस. एम. पाटील, आर. वाय. पाटील, प्रतापराव देशमुख, शैक्षणिक व्यासपीठाचे एस. डी. लाड, आदींसह शिक्षक सहभागी झाले होते. दरम्यान, उपोषणकर्त्या शिक्षकांची प्रकृती स्थिर असल्याचे कृती समितीचे उपाध्यक्ष जगदाळे यांनी सांगितले. ते म्हणाले, आमच्या मागणीबाबत दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे; पण यापूर्वी शासनाने दिलेला शब्द पाळलेला नाही. त्यामुळे अनुदान देण्याचा शासन आदेश होईपर्यंत आंदोलनाच्या माध्यमातून लढा सुरूच राहणार आहे. (प्रतिनिधी)