शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
3
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
4
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
5
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
6
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
7
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
8
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
9
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
10
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
11
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
12
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
13
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
14
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
15
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
16
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
17
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
18
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
19
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
20
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?

जिल्हा बॅँकेतील ठेवींच्या व्याजावरही ‘टीडीएस’

By admin | Updated: July 10, 2015 00:50 IST

ठेवीदार हवालदिल : कोल्हापूर जिल्ह्यात सव्वा लाख शेतकऱ्यांना फटका

विश्वास पाटील-कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत (केडीसीसी) ठेवलेल्या ठेवींवरील व्याज दहा हजारांहून जास्त झाल्यास त्यातून वीस टक्के टीडीएस कपात करून घेतली जात असल्याने ठेवीदारांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत; परंतु टीडीएस कपातीचा निर्णय आयकर विभागाचा आहे. त्याची अंमलबजावणी फक्त बँकेतर्फे सुरू असून, केंद्र सरकारच्या धोरणानुसारच ही कार्यवाही सुरू असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. बँकेच्या सुमारे सव्वा लाखांहून अधिक ठेवीदार शेतकऱ्यांना नव्या नियमाचा फटका बसत आहे.आतापर्यंत राष्ट्रीयीकृत बँकांतीलच ठेवींवरील व्याजातून टीडीएस कपात करून घेतली जात होती; परंतु केंद्रातील भाजप सरकारने एप्रिलपासून त्यामध्ये देशभरातील जिल्हा बँकांनाही समाविष्ट केले आहे. त्यासंबंधीचे आदेश जिल्हा बँकेलाही आले आहेत. त्यामुळे बँकेने १ एप्रिल ते ३० जून या तिमाहीतील व्याज रकमेतून टीडीएस कपात सुरू केली आहे. त्यामुळे ठेवीदारांतून नाराजी व्यक्त केली जात आहे; परंतु हा निर्णय जिल्हा बँकेचा नाही. तो केंद्र सरकारने घेतला असून, राज्यातील सगळ््या जिल्हा बँकांनी त्याविरोधात आवाज उठवूनही सरकार त्यातून सवलत द्यायला तयार नाही.मागच्या दहा वर्षांत पतसंस्थांची चळवळ भ्रष्टाचारामुळे मोडली. राष्ट्रीयीकृत बँकेत ठेव ठेवायची झाल्यास गावोगावी त्यांचे नेटवर्क नाही शिवाय गरजेला तातडीने पैसे हवे असतील तर इतक्या सुलभपणे मिळत नसल्याने सर्वसामान्य शेतकरी जिल्हा बँकेच्या शाखांमध्ये ठेव ठेवतो. आता ही गुंतवणूकही आयकर विभागाच्या रडारवर आल्याने कर भरण्यापेक्षा शेतकऱ्यांत त्याबद्दल भीतीच जास्त आहे. त्यातून नवी झंझट मागे लागेल की काय, अशी भीती त्यास वाटते.७० टक्के खातेदारांकडे पॅनकार्डच नाहीजिल्हा बँकेचे बचतखाते असलेले सुमारे १० लाखांहून जास्त ग्राहक आहेत. परंतू त्यातील ७० टक्क्यांहून जास्त लोकांकडे पॅनकार्ड नाही. कारण ते काढून घेण्याची तसदीच त्याने कधी घेतलेली नाही. त्यामुळे बँकेनेच आता त्याबद्दल जनजागरण करून गावोगावच्या शाखेतून पॅनकार्ड काढून देण्याची मोहीम हाती घेण्याची गरज आहे.व्याजाला सोकला आणि मुद्दलीला मुकला...केडीसीच्या शाखेत टीडीएस भरावा लागतो म्हणून ठेव काढून ती दुसरीकडे कुठेही ठेवायची झाल्यास तिथेही ‘टीडीएस’ आहेच. आता के्रडिट सोसायटी व पतसंस्थेतील ठेवींवर ही कपात नाही परंतु या संस्थांचा अनुभव चांगला नाही. त्यामुळे चार पैसे कर द्यावा लागतो म्हणून जिल्हा बँकेतील ठेव काढली तर व्याजासाठी मुद्दल अडचणीत येण्याचा धोका आहे. त्यापेक्षा कुटुंबातील अन्य सदस्यांच्या नावे ठेवी ठेवणे हादेखील पर्याय आहे.जिल्हा बँकेच्या ठेवींचा सरासरी व्याजदर साडेनऊ टक्के आहे. ज्यांची एक लाखांहून जास्त व एक वर्षापेक्षा जास्त मुदत असलेल्या ठेवींवर दहा हजारांहून जास्त व्याज होते. त्या शेतकऱ्याचे पॅनकार्ड नसेल तर त्यातून दोन हजार रुपये कपात करून घेण्यात येत आहेत. त्यामुळे दहा हजारांचा स्लॅब किमान ५० हजारांपर्यंत करावा, अशी मागणी होत आहे, परंतु त्यासाठी सर्वपक्षीय राजकीय पुढाऱ्यांनी शासनावर दबाव आणण्याची गरज आहे.उपाय काय...६० वर्षांखालील शेतकरी आणि अडीच लाख रुपये उत्पन्न असल्यास त्याने ‘१५ जी’ हा फॉर्म भरून दिल्यास कपात नाही.६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व तीन लाखांपर्यंतचे उत्पन्न असल्यास ‘१५ एच’ हा फॉर्म भरून दिल्यास कपात नाही.