शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

‘ताराराणी’ भविष्यात बहुमतासाठी आमच्यासोबत

By admin | Updated: December 26, 2016 00:19 IST

पी. एन. पाटील : जिल्हा परिषदेला पक्षांना नव्हे, तर स्थानिक आघाड्यांना सोबत घेऊ

कोल्हापूर : ताराराणी आघाडी पूर्वी काँग्रेस सोबत होती, आता भाजपबरोबर असली तरी उद्या जिल्हा परिषदेत बहुमतासाठी आमच्या सोबतही असेल, असे सूचक वक्तव्य काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केले. जिल्हा परिषद निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाबरोबर आघाडी करण्याचा प्रश्नच येत नाही, पण काही ठिकाणी स्थानिक आघाड्यांना सोबत घेऊ, असेही त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका काँग्रेस ताकदीने लढविणार आहे. प्रत्येक तालुकानिहाय बैठका घेऊन तयारी सुरू केली आहे. चंदगडमध्ये माजी राज्यमंत्री भरमूण्णा पाटील व ‘गोकुळ’चे संचालक राजेश पाटील हे एकत्र राहणार आहेत. भुदरगड, हातकणंगले, करवीरमध्ये बैठका घेतल्या आहेत. प्रदेश काँग्रेसने गुरुवारी (दि. २९) बैठक बोलावली आहे, त्यावेळी आघाडीबाबत संकेत मिळतील, असे पी. एन. पाटील यांनी सांगितले. भाजपला काही न करता सांगण्याची सवय असल्याने त्यांचा जिल्हा परिषद निवडणुकीबाबत हवा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण त्यांना उमेदवार आयातच करावे लागतील. राष्ट्रवादीच्या जन्मापासून जिल्हा परिषद निवडणुकीत आघाडी केली नसल्याने आताही स्वबळावरच सामोरे जाण्याची तयारी आम्ही केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना गेले दहा वर्षे आमच्यासोबत आहे, असेही ते म्हणाले.उद्या बंटी-महाडिक एकत्र येतील?पूर्वी महादेवराव महाडिक, सतेज पाटील, मालोजीराजे छत्रपती यांची ताराराणी आघाडी होती, त्यावेळी आम्हीच बाजूला होतो. राजकारणात कोण-कोणाचा कायमचा शत्रू व मित्रही नसतो, त्यामुळे उद्या सतेज पाटील व महाडिक एकत्र असतील आणि आम्हीच बाहेर जाऊ, असा टोला पी. एन. पाटील यांनी लगावला. आमची अवस्थाही राष्ट्रवादीसारखीचविनय कोरे भाजपसोबत गेल्याने राष्ट्रवादीला पन्हाळ्यात उमेदवार शोधावे लागतील. कागलमध्ये गेल्यावेळी संजय मंडलिक व संजय घाटगे आमच्यासोबत होते, आता ते इतर पक्षात गेल्याने तिथेही राष्ट्रवादीसारखीच आमची अवस्था झाल्याची कबुली पाटील यांनी दिली. आमचे इकडे-तिकडे नसते : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कोल्हापूर दौऱ्यावेळी सतेज पाटील यांच्यासह त्यांच्या गटाचे कार्यकर्ते उपस्थित नसल्याचे निदर्शनास आणून दिले असता, कार्यक्रम करवीर मतदारसंघात होता, त्यामुळे कदाचित ते आले नसतील. आम्ही एकमेकांच्या मतदारसंघात जात नसल्याचे स्पष्टीकरण पी. एन. पाटील यांनी दिले. राजेंद्र सूर्यवंशी काँग्रेसमध्ये येणार!शेतकरी कामगार पक्षाचे पंचायत समिती सदस्य राजेंद्र सूर्यवंशी हे कार्यकर्त्यांसह कॉँग्रेसमध्ये येणार आहेत. लवकरच मेळावा घेऊन अधिकृत पक्षात दाखल होतील, असे पाटील यांनी सांगितले.