शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

ताराराणी ते दसरा चौक रस्ता महिलांसाठी

By admin | Updated: October 10, 2016 00:53 IST

प्रदीप देशपांडे : नऊ मार्गांचा नकाशा प्रसिद्ध; पार्किंगचेही त्या-त्या परिसरात नियोजन

कोल्हापूर : मराठा क्रांती मूक मोर्चासाठी येणाऱ्या नागरिकांना साडेतीन किलोमीटरपेक्षा जास्त चालावे लागू नये, याची दक्षता पोलिस प्रशासनाने घेतली असून, दिशांनिहाय नऊ ठिकाणी पार्किंगचे नियोजन केले आहे. जिल्ह्यातील येणारे नागरिक ताराराणी चौक, दसरा चौक; तर शहरातील नागरिक गांधी मैदान येथे एकत्रित येणार आहेत. ताराराणी चौक ते दसरा चौक हा मार्ग मोर्चातील महिलांसाठी राखीव ठेवल्याची माहिती पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. महामार्गावरील वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशा प्रकारे पार्किंगचे नियोजन केले आहे. शिरोली नाका, उचगाव, सरनोबतवाडी, शाहू नाका, कळंबा नाका, पुईखडी, फुलेवाडी, शिवाजी पूल, शिये नाका या मार्गांवरून नागरिक ताराराणी चौकात मोर्चात सहभागी होतील. या मार्गांवरील वाहनांचे पार्किंग त्याच परिसरात केले आहे. दसरा चौकात सर्व एकत्रित येणार असल्याने येथून चारीही दिशांना किमान दोन किलोमीटरच्या रांगा राहणार आहेत. त्या दृष्टीने पोलिस यंत्रणेने नियोजन केले आहे. एका पार्किंग स्टेशनला एक अधिकारी, तीन वाहतूक कर्मचारी व चार कॉन्स्टेबल तैनात करणार आहेत. मोर्चाच्या मार्गावर तीस ठिकाणी वॉच टॉवर उभारणार आहेत. ठिकठिकाणी स्क्रीन लावणार आहेत. ‘एफएम’वरून मोर्चाची माहिती तातडीने पुरवली जाणार असल्याचे पोलिस अधीक्षक देशपांडे यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, पोलिस उपअधीक्षक (गृह) सतीश माने, शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, प्रशांत क्षीरसागर, राजू लिंग्रज, आदी उपस्थित होते. शिरोली नाका ते ताराराणी चौक : सांगली, मिरज, शिरोळ, जयसिंगपूर : रुईकर कॉलनी मैदान व परिसर, मार्केट यार्ड पाठीमागील रेल्वे गुड्स यार्ड, मुक्त सैनिक वसाहत परिसर, मुस्कान लॉन, रामकृष्ण लॉन. उचगाव ते ताराराणी चौक : कुुरुंदवाड, अब्दुललाट, इचलकरंजी, हुपरी, रेंदाळ, खिद्रापूर, घोसरवाड, पट्टणकोडोली, मुडशिंगी, कर्नाटक सीमाभाग, सदलगा : विक्रमनगर, आय.आर.बी. हॉटेल मैदान, धान्यबाजार, जनावरांचा बाजार, उर्दू शाळा, महापालिका शाळा, घाटगे-पाटील इंडस्ट्रीज परिसर. सरनोबतवाडी ते ताराराणी चौक : गांधीनगर, वळिवडे, इचलकरंजी, उचगाव रोडवरून येणारी जादा वाहने : युको बॅँकेमागील पटांगण, राजाराम तलाव परिसर जागा, राजाराम तलावालगतच्या टॉवरशेजारील पटांगण, एच.पी. गॅस गोडावून परिसर, सरनोबतवाडी. शाहू नाका ते ताराराणी चौक : चंदगड, आजरा, कागल, निपाणी, संकेश्वर, गडहिंग्लज, बेळगाव व सीमाभाग, नेर्ली, तामगाव, गोकुळ शिरगाव, कणेरीवाडी, कणेरी, कंदलगाव, गिरगाव, कोगिल : गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निक कॉलेज मैदान, राजाराम कॉलेज मैदान, शिवाजी विद्यापीठ परिसर, नॅनो टेक्नॉलॉजी मैदान, सिंथेटिक ट्रॅक मैदान, शांतिनिकेतन हायस्कूल मैदान, कृषी खाते मैदान, शेंडापार्क. कळंबा नाका ते दसरा चौक : कळंबा, गारगोटी, बिद्री, चंदगड, मुदाळ तिट्टा, राधानगरी, करवीर, मुरगूड, कावणे, निगवे खालसा, शेळेवाडी, भुदरगड : शेंडा पार्क ते सायबर चौक मार्गावरील एक बाजू, कृषी मैदान शेंडा पार्क, तपोवन मैदान. पुईखडी ते दसरा चौक : राधानगरी, वाशी, सडोली, परिते, घोटवडे, तारळे, कौलव, हळदी, कांडगाव, हसूर, करवीर : कृषी मैदान, शेंडा पार्क, तपोवन मैदान. फुलेवाडी ते दसरा चौक : बालिंगा, दोनवडे, कळे, भामटे, बाजारभोगाव, बोरबेट, कोदे, कुडित्रे, खुपिरे, सांगरूळ, गगनबावडा, साळवण, धुंदवडे : तपोवन मैदान, दत्तमंदिर फुलेवाडी मैदान, फुलेवाडी अंतर्गत रोड, पी. एन. पाटील गॅरेज ते बोंद्रेनगर रिंगरोड. शिवाजी पूल ते दसरा चौक : पन्हाळा, शाहूवाडी, आंबेवाडी, आसुर्ले-पोर्ले, केर्ली, मलकापूर, बांबवडे, सरुड, पिशवी, साळशी : पाटील समाधी परिसर, जयहिंद धाबा, पाटील पेट्रोल पंप, सोनतळी मैदान. शिये नाका ते दसरा चौक : शिये, अंबप, वाठार, किणी, वडगाव, वारणानगर, कोडोली, पारगाव, तळसंदे , सावर्डे, टोप, खोची, लाटवडे, संभापूर, हातकणंगले, कऱ्हाड, सातारा, इस्लामपूर : कसबा बावडा पॅव्हेलियन मैदान, संग्राम पाटील लेआउट, ताराराणी चौक, गोळीबार मैदान, राजाराम कारखाना वाहनतळ. शिरोली नाका ते ताराराणी चौक : सांगली, मिरज, शिरोळ, जयसिंगपूर : रुईकर कॉलनी मैदान व परिसर, मार्केट यार्ड पाठीमागील रेल्वे गुड्स यार्ड, मुक्त सैनिक वसाहत परिसर, मुस्कान लॉन, रामकृष्ण लॉन. उचगाव ते ताराराणी चौक : कुुरुंदवाड, अब्दुललाट, इचलकरंजी, हुपरी, रेंदाळ, खिद्रापूर, घोसरवाड, पट्टणकोडोली, मुडशिंगी, कर्नाटक सीमाभाग, सदलगा : विक्रमनगर, आय.आर.बी. हॉटेल मैदान, धान्यबाजार, जनावरांचा बाजार, उर्दू शाळा, महापालिका शाळा, घाटगे-पाटील इंडस्ट्रीज परिसर. सरनोबतवाडी ते ताराराणी चौक : गांधीनगर, वळिवडे, इचलकरंजी, उचगाव रोडवरून येणारी जादा वाहने : युको बॅँकेमागील पटांगण, राजाराम तलाव परिसर जागा, राजाराम तलावालगतच्या टॉवरशेजारील पटांगण, एच.पी. गॅस गोडावून परिसर, सरनोबतवाडी. शाहू नाका ते ताराराणी चौक : चंदगड, आजरा, कागल, निपाणी, संकेश्वर, गडहिंग्लज, बेळगाव व सीमाभाग, नेर्ली, तामगाव, गोकुळ शिरगाव, कणेरीवाडी, कणेरी, कंदलगाव, गिरगाव, कोगिल :