शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

जयसिंगपूरच्या विकासासाठी ‘ताराराणी’ कटिबद्ध : माने

By admin | Updated: December 27, 2016 23:53 IST

नगराध्यक्षासह ताराराणीच्या नगरसेवकांचे पदग्रहण

जयसिंगपूर : पारदर्शी व लोकाभिमुख कारभार करण्यासाठी विकासकामांचा आराखडा तयार करुन पाणीप्रश्नाबरोबरच भुयारी गटर योजना, झोपडपट्टीवासीयांचा प्रश्न सोडविण्याबाबत ताराराणी आघाडी कटिबद्ध राहील, जनता दरबाराच्या माध्यमातून प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही नगराध्यक्ष डॉ. नीता माने यांनी दिली.ताराराणी आघाडीच्या नगराध्यक्ष व नगरसेवक यांनी सोमवारी पालिकेचा पदभार स्वीकारला. यावेळी नगराध्यक्ष माने बोलत होत्या. पदभार स्वीकारल्यानंतर यावेळी मुख्याधिकारी हेमंत निकम यांनी नगराध्यक्ष माने यांचे स्वागत केले. पालिकेच्या छत्रपती राजर्षी शाहू महाराज खुले नाट्यगृहात नूतन नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. स्वागत पक्षप्रतोद बजरंग खामकर यांनी केले. प्रास्ताविक नगरसेवक सर्जेराव पवार यांनी केले. त्यानंतर पालिका निवडणुकीत ताराराणी आघाडीकडून लढलेल्या उमेदवारांबरोबरच नूतन नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. नगरसेविका सोनाली मगदूम, डॉ. महावीर अक्कोळे, भाजपचे मंडलाध्यक्ष मिलिंद भिडे, नगरसेवक पराग पाटील, जि. प. सदस्य सावकर मादनाईक, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल यादव, फारुख पठाण, शंकर बिराजदार यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी आमदार उल्हास पाटील, विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, दलितमित्र अशोकराव माने, डॉ. श्रीवर्धन पाटील, धनाजीराव जगदाळे, मिलिंद साखरपे, भरत बागरेचा, शीतल गतारे, चंद्रकांत जाधव, विनोद चोरडिया यांच्यासह ताराराणी आघाडीचे नगरसेवक, नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन शैलेश आडके यांनी केले. नगरसेवक शैलेश चौगुले यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)या प्रश्नांना प्राधान्य पालिकेची आर्थिक स्थिती सध्या काय आहे, याची माहिती जनतेला समजावी. यासाठी श्वेतपत्रिका काढली जाणार असून, प्रलंबित असणारा शिवाजी महाराजांचा पुतळा, पालिका शाळांचा दर्जा, सांडपाण्याचे नियोजन, झोपडपट्टीसाठी पायलट योजना, नागरिकांच्या तक्रारीचे निवारण होण्यासाठी मोबाईल अ‍ॅपची सुविधा, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सोय याचबरोबर अनेक विकासात्मक धोरणे राबविली जाणार असल्याचे नगराध्यक्ष माने यांनी सांगितले.