शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

पाणी योजनेत गैरकारभार करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करा

By admin | Updated: December 27, 2016 01:02 IST

‘आंदोलन अंकुश’चे आंदोलन : हलगीवादनासह साखर वाटली

कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील विविध गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाणी योजना राबविण्यात आली. त्यामध्ये खोटी मोजमापे लावून करोडो रुपये लाटणाऱ्या ठेकेदार व अभियंत्यांवर त्वरित कारवाई करावी. या मागणीसाठी शिरोळ येथील ‘आंदोलन अंकुश’ या संस्थेच्यावतीने कोल्हापुरातील जिल्हा परिषदेच्या कार्यालयाबाहेर सोमवारी दुपारी हलगीच्या कडकडाटात व येणाऱ्या अभ्यागतांना साखर वाटून आंदोलन केले. शिरोळ तालुक्यातील तेरवाड, कवठेसार, नृसिंहवाडी, आलास, शिरढोण, टाकवडे, लाटवाडी, शिरदवाड, शिवनाकवाडी व गणेशवाडी या गावच्या पाणी योजनांमध्ये झालेल्या गैरकारभाराबाबत आंदोलन अंकुश संस्थेच्यावतीने पाठपुरावा केला जात आहे. त्यात दोनवेळा उपोषण, ठिय्या आंदोलन, एकदा हलगी वादन आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अद्यापही ठेकेदार व संबंधित अभियंत्यांवर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत प्रशासनाने ठोस कारवाई केलेली नाही. याबाबत प्रशासनाच्यावतीने संस्थेला कारवाई सुरू आहे, एवढेच उत्तर दिले जात आहे. अद्यापही ठोस कारवाई केलेली नाही. त्यामुळे या संबंधितांवर त्वरित कारवाई करावी. ज्यांनी गैरकारभार केला आहे अशांवर जबाबदारी निश्चित करावी. आलास येथे केलेल्या खुदाईचा दर प्रतिमीटर ५७ ते ७५ रुपये असताना ठेकेदारास २४१ इतका प्रतिमीटर दर दिला आहे. त्यापोटी दिलेले ४८ लाख रुपये ठेकेदाराकडून व संबंधित अभियंत्यांकडून वसूल करावेत. यासह नृसिंहवाडी येथेही १३१ रुपये प्रतिमीटर खुदाई दर असताना तेथे ३८५ रुपये इतका दर दिला आहे. यापोटी ठेकेदारास २६ लाख रुपये अदा केले आहेत. सोमवारी दुपारी बारा वाजता संस्थेच्या कार्यकर्त्यांनी प्रथम मुख्य प्रवेशद्वाराबाहेर येणाऱ्या व जाणाऱ्या अभ्यागतांना साखर वाटून जिल्हा परिषदेचे अभिनंदन केले यासह हलगी वादनही केले. यावेळी पोलिसांनी प्रवेशद्वाराऐवजीबाहेर आंदोलन करा, असे आंदोलनकर्त्यांना सांगितले. अन्यथा ताब्यात घेऊ असा इशारा दिला. यावेळी किरकोळ वादावादी झाल्यानंतर गेटबाहेर आंदोलन केले. या आंदोलनात धनाजी चुडमुंगे, प्रशांत बंडगर, दत्ता मोरे, गुरू खाचरे, दिलीप माणगांवे, प्रवीण पाटील, संजय कुलकर्णी आदींनी सहभाग घेतला.