शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कुरुंदवाड : पंचगंगा नदी प्रदूषणाकडे दुर्लक्ष करणार्‍या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर व प्रदूषण करणार्‍या घटकांवर त्वरित ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कुरुंदवाड : पंचगंगा नदी प्रदूषणाकडे दुर्लक्ष करणार्‍या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर व प्रदूषण करणार्‍या घटकांवर त्वरित गुन्हा दाखल करावा, नदी प्रदूषणामुळे संतप्त भावनेतून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत, यासाठी स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदन दिले.

दरम्यान, जिल्हाधिकारी देसाई यांनी, नदीत प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्यात येईल तसेच संघटनेच्या कार्यकर्त्यांवरील दाखल गन्ह्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांशी बोलून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

गत आठवड्यात पंचगंगा नदी प्रदूषणाची पाहणी करण्यासाठी आलेले प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी सचिन हरबड यांना संतप्त स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी तेरवाड बंधाऱ्यावरच दोरखंडने बांधून ठेवले होते. त्यामुळे अधिकारी हरबड यांनी स्वाभिमानी युवा आघाडी तालुकाध्यक्ष बंडू पाटील (रा. हेरवाड, ता. शिरोळ), विश्वास बालीघाटे (रा. शिरढोण) याच्यासह अज्ञात पाचजणांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कुरुंदवाड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला होता.

सार्वजनिक न्याय हक्कासाठी आंदोलन करणार्‍या स्वाभिमानीच्या या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत आणि नदी प्रदूषण करणार्‍या घटकांवर तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी माजी आमदार उल्हास पाटील, मिलिंद साखरपे, अकिवाट सरपंच विशाल चौगुले, बंडू उमडाळे, संजय अपराज, शैलेश चौगुले यांच्यासह स्वाभिमानीचे पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो -

तेरवाड (ता. शिरोळ) बंधाऱ्यावरील आंदोलनप्रश्‍नी स्वाभिमानी कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदन दिले.