शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

तायक्वांदोत कोल्हापूरचे वर्चस्व

By admin | Updated: December 10, 2015 01:15 IST

विभागीय ग्रामीण स्पर्धा : १३ संघांचा सहभाग; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

कनेडी (सिंधुदुर्ग) : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचनालय पुणे, जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग, तायक्वांदो असोसिएशन आॅफ सिंधुदुर्ग आणि कनेडी गटशिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या विभागीय ग्रामीण तायक्वांदो स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडंूनी वर्चस्व मिळविले आहे.स्पर्धेचे उद्घाटन प्रशालेचे चेअरमन एल. डी. सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. कनेडी महाविद्यालयाच्या ज्ञानदीप सांस्कृतिक हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत रत्नागिरी, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील १३ संघांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविलेले खेळाडू राज्यस्तरीय ग्रामीण स्पर्धेत कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या स्पर्धेच्या वेळी सहायक क्रीडा अधिकारी स्नेहल जगताप, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य नाना सावंत, पर्यवेक्षक आर. एच. सावंत, जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे सचिव भालचंद्र कुलकर्णी, विनायक सापळे, क्रीडा समन्वयक बयाजी बुराण उपस्थित होते. पंच म्हणून एकनाथ धनवटे, उमाजी पोवार, अजय निगडेकर, विजय जावीर, अक्षय कुलकर्णी, संदेश परब, पूजा वाळके, नितीन तावडे यांनी काम पाहिले. या स्पर्धेतील सुवर्ण, रौप्य, कांस्यपदक विजेते पुढीलप्रमाणे- १६ वर्षांखालील मुले- वजनगट ४८ किलो- राहुल साबळे (कोल्हापूर), सूरज माने (सातारा), प्रथमेश गवळी (सांगली). वजनगट ५१ किलो-नागराज चौगुले (सिंधुदुर्ग), सौरभ पाटील (कोल्हापूर), प्रतीक सावंत (सांगली) व अभिषेक लकड े(सातारा). वजनगट ५५ किलो- प्रथमेश चव्हाण (रत्नागिरी), स्वप्निल तावडे (सिंधुुदुर्ग), सोमेश इंगवले (सांगली), शुभम पाटील (कोल्हापूर). वजनगट ५९ - ऋषिकेश पाटील (कोल्हापूर), चेतन पवार (रत्नागिरी), स्वप्निल देशमुख (सांगली) व जय जाधव (सातारा). वजनगट - ६३ किलो - राघव पटेल (रत्नागिरी), दिग्विजय पाटील (कोल्हापूर), नीलेश पाटील (सांगली) व अविष्कार माने (सातारा). वजनगट ६८ किलो- सूरज कांबळे (कोल्हापूर), ऋषिकेश गणाधारी (सांगली). वजनगट ७३ किलो- रोहित गडदे (सांगली), प्रतीक निरबोळे (कोल्हापूर). वजनगट ७३ किलो- इंद्रजित गायकवाड (सांगली).मुली - वजनीगट ४४ किलो- सृष्टी डोंगरे (कोल्हापूर), आरती तिबे (सांगली), दीक्षिता राऊत (सिंधुदुर्ग) व श्वेता जाधव (सातारा). वजन गट ४७ किलो - सिद्धी निकम (कोल्हापूर), वैष्णवी साळुंखे (सांगली), दिव्या पेडणेकर (सिंधुदुर्ग) व प्रतीक्षा चव्हाण (रत्नागिरी), वजनगट ५१ किलो - कोमल पोवार (कोल्हापूर), सायली जाधव (सातारा), अंकिता वाघमारे (सांगली) व अश्विनी कोकम (सिंधुदुर्ग). वजनगट ५५ किलो - कोमल घराळ (कोल्हापूर), नायला नाईक (सिंधुदुर्ग). वजनगट ५५ किलोवरील - धनश्री घराळ (कोल्हापूर), अंकिता जाधव (सातारा), अंकिता कागवडे (सांगली) यांनी यश मिळविले. (वार्ताहर)