शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
4
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
6
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
7
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
8
"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
9
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
10
Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
11
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
12
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
13
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
14
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
15
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
16
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
17
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
18
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
19
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
20
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?

गोड, पौष्टिक ‘हनुमान’ फळाची बाजारात भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 00:29 IST

कोल्हापूर : फळबाजारात ‘हनुमान’ फळाची आवक झाली असून, हे ‘गोड’ फळ ग्राहकांना भुरळ पाडत आहे. किरकोळ बाजारात त्याचा ७० ...

कोल्हापूर : फळबाजारात ‘हनुमान’ फळाची आवक झाली असून, हे ‘गोड’ फळ ग्राहकांना भुरळ पाडत आहे. किरकोळ बाजारात त्याचा ७० रुपये किलो दर असून, इतर फळांचे दर स्थिर आहेत. ‘मेथी’, ‘कोथिंबीर’ची आवक मंदावली व मागणी वाढल्याने दर तेजीत आहे. किरकोळ बाजारात १५ रुपये मेथी, तर ३0 रुपये कोथिंबिरीची पेंढी आहे. तुलनेने ‘पोकळ्या’चे दर स्थिर असून, डाळीच्या दरात मात्र काहीशी वाढ होत आहे.दसरा संपल्याने फळबाजारात थोडीशी शांतता आहे. सफरचंद, संत्री, चिक्कू, पेरू, सीताफळ, डाळिंबांची आवक व मागणी सारखी असल्याने दरात फारशी चढउतार दिसत नाही. बोरांची आवक सुरू झाली असून, घाऊक बाजारात सरासरी २0 रुपये किलो दर आहे. ‘हनुमान’फळांची आवक सुरू झाली असून, दिसायला सीताफळासारखे असणारे हे फळ एकदम गोड असते. या फळात ‘बी’ कमी व गर जास्त असल्याने ग्राहकांच्या ते पसंतीस पडत आहे.भाजीपाला बाजारात तो चढउतार दिसत नसली तरी ओली मिरची, ओला वाटाणा, वरणाच्या दरात गेल्या आठवड्यापेक्षा वाढ झाली आहे. ओल्या वाटाण्याची आवक स्थिर असली तरी मागणी वाढल्याने घाऊक बाजारात ७५ रुपये किलोपर्यंत दर पोहोचला आहे. टोमॅटोची आवक स्थिर असल्याने दर सरासरी सात रुपयांवर कायम राहिला आहे. कोबी, वांगी, गवार, कारली, भेंडी, दोडका या प्रमुख भाज्यांचे दर स्थिर आहेत. मेथी, पालकचे दर चढेच आहेत. किरकोळ बाजारात १५ रुपये पेंढी आहे. तुलनेने पोकळ्याची पेंढी १0 रुपये आहे. कोथिंबिरीचा दर ३0 रुपये पेंढी झाला असून, पाच रुपयांना कोथिंबिरीच्या पाच काड्याच हातात येत आहेत.दिवाळी १५ दिवसांवर आल्याने कडधान्य बाजार सज्ज दिसतो. ऐन दिवाळीच्या तोंडावर डाळींच्या दरात हळूहळू वाढ होत आहे. तूरडाळ ७२, मूगडाळ ८०, हरभरा डाळ ६५ रुपये दर आहे. साखरेच्या दरात चढउतार नसून किरकोळ बाजारात मात्र ३६ रुपये किलो दर राहिला आहे. शेंगदाणा, मैदा, पोहे, रवा, गूळ, शाबूदाणाचे दर मात्र तुलनेने स्थिर आहेत.कांदा वधारलागेल्या आठवड्यात घाऊक बाजारात कांदा सरासरी १० रुपये किलो होता. या आठवड्यात कांदा सरासरी १४ रुपयांपर्यंत गेला आहे. लसणाच्या दरातही थोडी वाढ झाली असून, प्रतिकिलो २५ रुपये, पण बटाट्याचे दर स्थिर आहेत.