शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानीची आजपासून मिस कॉल मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:28 IST

कोल्हापूर : निती आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारकडून एफआरपी तीन तुकड्यांत देण्याच्या घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात आज, रविवारपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ...

कोल्हापूर : निती आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारकडून एफआरपी तीन तुकड्यांत देण्याच्या घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात आज, रविवारपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्यभर मिसकॉल मोहीम सुरू होत आहे. स्वत: शेट्टी यांच्या नावाने घेतलेल्या फोन क्रमांकावरच या महिनाअखेरपर्यंत हे कॉल देऊन न्यायालयात खेचण्यासाठी माहितीचे संकलन सुरू होत आहे. ८४४८१८३७५१ या मोबाईल क्रमांकावर मिस कॉल द्यायचा आहे.

पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू असतानाच निती आयोग व कृषी मूल्य आयोगाने एफआरपी ६०:२०:२० अशा तीन टप्प्यांत देण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली. राज्य सरकारनेही टास्क फोर्सकडे यासाठी अनुकूलता दर्शवली आहे. शेतकऱ्यांचे नुकसान करणारी ही शिफारस असल्याने शेट्टी यांनी यावर एकाच वेळी रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाईची घोषणा केली आहे. थकीत एफआरपीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात यापूर्वीच याचिका दाखल केलेली आहे. तेथेच संसदेची मान्यता नसतानाही एफआरपीची मोडतोड केल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली जाणार आहे. त्यासाठी पुरावा म्हणून एफआरपी मोडतोडीला विरोध असणाऱ्या शेतकऱ्यांची नावे असणे आवश्यक आहे. म्हणून संघटनेने १२ ते ३० सप्टेंबर अशी २० दिवसांची मिसकॉल मोहीम हाती घेतली आहे. त्याची सुरुवात आज होत आहे.

मिस कॉल देणे म्हणजे एकरकमी एफआरपी मान्य असलेले, तर तीन टप्प्यांत एफआरपी नाकारणारे शेतकरी ठरणार आहेत. यातून तयार होणारी माहिती पुरावा म्हणून सर्वोच्च न्यायालयात सादर केली जाणार असल्याने शेतकऱ्यांनी मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन शेट्टी यांनी केले आहे.