शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

संशयित कामगार ताब्यात

By admin | Updated: April 26, 2015 01:15 IST

अपहरण प्रकरण : मुलासह आपलेही अपहरण झाल्याचे सांगितले कथानक

इचलकरंजी : महेश सेवा समिती येथून व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या अमोल आदिनाथ पडसलगे (वय २४, रा. कबनूर) याला शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. तो जखमी अवस्थेत असून, त्याच्यावर आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पडसलगे याने प्राथमिक चौकशीत अपहरणाबाबत फिल्मी कथानक सांगितले आहे. त्यामुळे नेमका प्रकार काय हे याबाबत पडसलगेला अटक करून चौकशी केल्यानंतरच उघडकीस येणार आहे. शुक्रवारी महेश सेवा समिती येथील साखरपुडा समारंभातून ट्रेडिंग व्यापारी श्रीकांत बलदवा यांचा अडीच वर्षांचा मुलगा आरव याचे अपहरण झाले होते. त्याला सांभाळणारा कामगार अमोल पडसलगे हाही सकाळपासून बेपत्ता होता. त्यामुळे त्यानेच अपहरण केले असावे, अशी शक्यता व्यक्त होत होती. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास आयको मिलजवळील एका पडक्या घरात आरव बांधलेल्या अवस्थेत मिळून आला. मात्र, पडसलगे हा बेपत्ताच होता. शनिवारी पहाटेच्या सुमारास पडसलगे घरी परत आल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना समजली. पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेतले. त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली असल्याने पोलिसांनी त्याला आयजीएम रुग्णालयात दाखल केले. यावेळी प्राथमिक चौकशीत त्याने मुलासह आपलेही चाकूचा धाक दाखवून अपहरण केल्याचे कथानक सांगितले आहे. यामध्ये सहा हिंदी बोलणाऱ्या अपहरणकर्त्यांनी सुरुवातीला बसमधून, त्यानंतर काळ्या व्हॅनमधून आपले अपहरण केल्याचे सांगितले. मात्र, त्याच्या सांगण्यात व घटनाक्रमात तफावत असल्याने तो बनाव करीत असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. आज, रविवारी त्याला अटक करून त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतरच या प्रकरणाचा नेमका उलगडा होईल, असेही पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पडसलगे आरव याला घेऊन जाताना महेश समितीजवळील सीसीटीव्हीत, तसेच आयको स्पिनिंग मिलकडे जाणाऱ्या मार्गावरील एका सीसीटीव्हीमध्ये दिसून आला आहे. त्यामुळे स्वत:च्या बचावासाठी पडसलगे बनाव करीत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)