शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कोंडकेंवरील अविश्वास ठरावाला स्थगिती

By admin | Updated: August 15, 2014 00:52 IST

न्यायालयाचा निर्णय : पुढील सुनावणी ६ सप्टेंबरला

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय कोंडके यांच्या विरोधातील अविश्वास ठरावाला आज, गुरुवारी सहदिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर चव्हाण यांनी स्थगिती दिली. या प्रकरणाच्या पुढील सुनावणीसाठी ६ सप्टेंबर ही तारीख देण्यात आली आहे. महामंडळाचा फेरलेखापरीक्षणाचा अहवाल देण्यावरून चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांच्यावर अभिनेत्री छाया सांगावकरने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. त्यांच्यासोबत अर्जुन नलवडे आणि सुरेंद्र पन्हाळकर होते. या प्रकरणावर चर्चा व निर्णय घेण्यासाठी ४ आॅगस्ट रोजी खासबाग येथील कार्यालयात चित्रपट महामंडळाच्या कार्यकारिणीची तातडीची बैठक बोलावण्यात आली  होती. यावेळी कार्यकारिणी सदस्यांनी महामंडळाची आणि उपाध्यक्षांची बदनामी केल्याबद्दल या तिघांचेही सभासदत्व रद्द करण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्याला अध्यक्ष विजय कोंडके यांनी विरोध केला होता. या तिघांनाही अध्यक्षांचीच फूस असल्याचा आरोप करत कार्यकारिणीने या बैठकीत त्यांच्याविरोधात ९ विरुद्ध २ असा अविश्वास ठराव करून त्यांना तातडीने पदमुक्त केले होते. येत्या १५ तारखेला नूतन अध्यक्षांची निवड करण्यात येणार होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केल्याप्रमाणे या अविश्वास ठरावाला विजय कोंडके यांनी सहदिवाणी न्यायालयात आव्हान दिले. यावर आज पहिली सुनावणी झाली. यात अ‍ॅड. पी. आर. पाटील यांनी कोंडके यांची बाजू मांडली. बैठकीच्या दिवशी फक्त विनयभंग प्रकरणाच्या चौकशीचा विषय अजेंड्यावर होता. त्याव्यतिरिक्त अन्य विषयांवर चर्चा केली जाणार नाही, हे नमूद होते. अविश्वास ठरावासाठी १५ दिवस आधी नोटीस देणे गरजेचे असते, असे मुद्दे मांडून हा ठराव बेकायदेशीर असल्याचे सांगितले. यावर न्यायाधीश चव्हाण यांनी अध्यक्षांच्या कामात अडथळा निर्माण करू नये, अशी टिप्पणी करीत त्यांच्यावरील अविश्वास ठरावाला स्थगिती दिली. तसेच नूतन अध्यक्ष निवड केली जाऊ नये, असे सांगितले असल्याची माहिती अ‍ॅड. पाटील यांनी दिली. (प्रतिनिधी)