शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

नृसिंहवाडी ग्रामपंचायत बरखास्तीला स्थगिती

By admin | Updated: June 3, 2015 01:02 IST

जगदाळे यांची माहिती : ग्रामविकास मंत्रालयाचे आदेश

नृसिंहवाडी : नृसिंहवाडी येथील दुकानगाळ्याप्रश्नी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल पुणे विभागीय आयुक्तांनी नृसिंहवाडी ग्रामपंचायत बरखास्त करण्याच्या आदेशाला राज्य शासनाने स्थगिती दिली आहे.नृसिंहवाडी येथील दुकानगाळेप्रश्नी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल आंदोलन अंकुशच्या तक्रारीवरून विभागीय आयुक्त पुणे यांनी १३ एप्रिल रोजी नृसिंहवाडी ग्रामपंचायत बरखास्त करण्याचे आदेश दिले होते. या विरोधात सरपंच राजश्री कांबळे यांच्यासह आठ सदस्यांनी राज्याच्या ग्रामविकास विभागाकडे अपील केले होते. त्यानुसार ग्रामपंचायत बरखास्त स्थगितीचे आदेश कार्यासन अधिकारी चंद्रकांत वळाप यांनी दिले. तसे पत्र विभागीय आयुक्त पुणे, मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. कोल्हापूर व गटविकास अधिकारी शिरोळ यांच्यासह ग्रामपंचायातीस प्राप्त झाल्याची माहिती उपसरपंच अभिजित जगदाळे व ग्रा.पं. सदस्य अनंत धनवडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सरपंच सौ. राजश्री कांबळे उपस्थित होत्या.उपसरपंच अभिजित जगदाळे म्हणाले, चुकीच्या ध्येयधोरणावर काम करत गावाला नाहक वेठीस धरणाऱ्या आंदोलन अंकुश च्या या लढ्यात आम्हाला यश मिळाले. ज्या दुकानगाळ्याप्रश्नी ग्रामपंचायत बरखास्त झाली, त्या गाळेधारकांना ग्रामपंचायतीचे नुकसान न करता तीस टक्के भाडेवाढ करून बेरोजगार दुकानदारांचे हित जपले. हे सर्वांनी लक्षात घ्यावे, असे सांगून या लढ्यात आम्हाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे, राज्यमंत्री दीपक केसरकर, आमदार सुरेश हाळवणकर, योगेश ठिळेकर, अमल महाडिक यांचे सहकार्य लाभल्याचे नमूद करून गावाच्या विकासकामात खोड घालणाऱ्या आंदोलन अंकुशने गावची बदनामी करणे थांबवावे, असे आवाहन केले.ग्रा. पं. सदस्य अनंत धनवडे, महाआघाडीचे अध्यक्ष विकास पुजारी म्हणाले, ग्रामपंचायतीने गेल्या साडेचार वर्षांत चांगला कारभार केला आहे. ग्रामपंचायतीवर बदनामीचे आरोप आंदोलन अंकुशने करू नयेत.यावेळी वकील प्रकाश भेंडवडे यांचा सत्कार केला. ग्रा. पं. सदस्य परशुराम गवंडी, अशोक पुजारी, सौ. अरुंधती पुजारी, सौ. कांचन कंदले यांच्यासह सोमनाथ पुजारी, तानाजी कदम, बाळासाहेब आलासकर, बाळकृष्ण कंदले, कृष्णा गवंडी, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)